Simhastha Kumbh Mela | रामतीर्थावर तीन दिवसीय यज्ञकर्माची पूर्णाहुतीने सांगता; शंकराचार्य विधुशेखर भारती महास्वामी यांच्या हस्ते विधिवत पूजा

Simhastha Kumbh Mela | ध्वजारोहण : शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या उपस्थितीत पूजाविधी
Simhastha Kumbh Mela
Simhastha Kumbh Mela
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोदावरी नदीच्या तीरावर नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त आयोजित तीन दिवसीय यज्ञकर्माची शृंगेरीपीठाचे शंकराचार्य जगद्गुरू विधुशेखर भारती महास्वामी यांच्या हस्ते रविवारी (दि. १) दुपारी पूर्णाहुती देऊन भक्तिमय वातावरणात सांगता झाली. याप्रसंगी ध्वजारोहण सोहळ्याचाही औपचारिक समारोप करण्यात आला.

Simhastha Kumbh Mela
Nashik ZP to NASA | जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मिळणार 'नासा' दौर्याची सुवर्णसंधी; 'नाशिक ते नासा' उपक्रमांतर्गत मोठी घोषणा

धार्मिक विधी, वैदिक मंत्रोच्चार आणि भक्तांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने गोदावरीतीरावर आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. शंकराचार्य विधुशेखर भारती महास्वामी यांचे नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी रामकुंड येथे जाऊन यज्ञस्थळी उपस्थिती लावली.

यावेळी विधिवत पूजा-अर्चा करून त्यांनी यज्ञात पूर्णाहुती अर्पण केली. त्यानंतर गंगा-गोदावरीचे पूजन करण्यात आले. तसेच ध्वजस्तंभाचे पूजन करून ध्वजारोहण सोहळ्याचीही औपचारिक सांगता करण्यात आली. तत्पूर्वी यज्ञकर्मासाठी स्थापित करण्यात आलेल्या देवतांचे प्रात:पूजन करण्यात आले. त्यानंतर उत्तरारांग आणि बलिदान विधी पार पडला.

सर्व धार्मिक विधी वैदिक परंपरेनुसार मंत्रोच्चारात पार पडल्यानंतर शंकराचाऱ्यांच्या हस्ते यज्ञाची पूर्णाहुती देण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी धार्मिक विधींचे दर्शन घेतले. या सोहळ्याचे यजमान म्हणून सुहास शुक्ल यांनी जबाबदारी पार पाडली. तर पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सिंहस्थ समितीचे अध्यक्ष सतीश शुक्ल व प्रतीक शुक्ल यांच्यासह शांतारामशास्त्री भानोसे, दिनेशशास्त्री गायधनी, शेखरशास्त्री शुक्ल, नितीनशास्त्री पारशे,

मंदारशास्त्री देव, कल्पेशशास्त्री दीक्षित, सौरमशास्त्री गायधनी, अनिशशास्त्री पंचमध्ये, गौरवशास्त्री पंचमध्ये, मानसशास्त्री गायधनी, रामशास्त्री नाचन, बापूशास्त्री देव, वैभवशास्त्री दीक्षित आदी पुरोहित व शास्त्रपंडितांनी हा यज्ञ यशस्वी केला. दरम्यान, शृंगेरीपीठ शंकराचाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या पूर्णाहुती सोहळ्यामुळे या धार्मिक अनुষ্ঠानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

Simhastha Kumbh Mela
Nashik ZP to NASA | जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मिळणार 'नासा' दौर्याची सुवर्णसंधी; 'नाशिक ते नासा' उपक्रमांतर्गत मोठी घोषणा

शंखनादाने कार्यक्रमांची झाली होती सुरुवात

सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने गोदावरीतीरावर २५ ऑक्टोबरपासून विक्रमी शंखनादाने विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. यात शनिवार (दि. ३०) ध्वजदंड प्रतिष्ठापना, धर्मध्वजपूजन, ग्रामप्रदिक्षण आदि भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यात यज्ञविधी, देवतांची स्थापना व पूजन, वैदिक मंत्रोच्चार आणि ध्वजारोहणाशी संबंधित धार्मिक कार्यक्रमांमुळे रामकुंड परिसर भक्तिमय वातावरण होते. तीन दिवस चाललेल्या या धार्मिक अनुष्ठानाका पूर्णाहुतीने विधिवत समारोप झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.