Nashik Third Leopard Trapped | लोहशिंगवेत तिसरा बिबट्या जेरबंद

Nashik Third Leopard Trapped | लोहशिंगवेत तिसरा बिबट्या जेरबंद
leopard
देवळाली कॅम्प : लोहशिंगवेतील जुंद्रे मळ्यातील पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या.pudhari photo
Published on
Updated on

नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर वनविभागाने पिंजरा लावला होता, ज्यामध्ये सोमवारी एक बिबट्या जेरबंद झाला. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या दोन महिन्यांत या परिसरात जेरबंद झालेला हा तिसरा बिबट्या आहे.

Third Leopard Trapped at Lohashingve Nashik

देवळाली कॅम्प : नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथील किरण जुद्रे, नारायण जुद्रे यांच्या मळ्यात वनविभागाने ठेवलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून, हा गत दोन महिन्यात जेरबंद झालेला तिसरा बिबट्या आहे.

leopard
Saptashrungi Gad Devotee Death | सप्तशृंगगड यात्रेत चक्कर येऊन भाविकाचा मृत्यू

दारणाकाठच्या लोहशिंगवे गावात गेल्या १५ दिवसांपासून २ ते ३ बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून, येथील पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत आहेत. त्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने रविवारी (दि. २९) दुपारी पिंजरा ठेवला होता. सोमवारी (दि. ३०) सकाळी नारायण जुंद्रे हे आपल्या पाळीव प्राण्यांना चारा-पाणी देण्यासाठी गेले असता, त्यांना पिंजऱ्यातून बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज आला. त्यांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत

leopard
Sinner Parking Dispute Crime | दुचाकी पार्किंगच्या वादातून एकाचा खून, धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला

लोहशिंगवे परिसरात बिबट्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. आतापर्यंत तीन बिबटे जेरबंद झाले असले, तरी अद्यापही दोन ते तीन बिबटे फिरत आहेत. त्यांनादेखील जेरबंद करावे.

-संतोष जुंद्रे, माजी सरपंच

फोनवरून माहिती दिली. त्यानुसार वनविभागाचे विजयसिंह पाटील, अशोक खानझोडे, सुरेश माळी, पांडुरंग भांगरे यांनी घटनास्थळी येत पिंजरा नाशिकला हलविला. या भागात अजून दोन ते तीन बिबट्यांचा मुक्त संचार असल्यामुळे त्यासाठी पुन्हा पिंजरा लावावा अशी मागणी माजी सरपंच संतोष जुद्रे, युवराज जुंद्रे, किरण जुंद्रे, नारायण जुद्रे, हरी पाटोळे, गणेश पराड, शांताराम जुद्रे, योगेश जुद्रे आदींनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news