ओझर येथे फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाला लुटून चोरटे फरार

चोरट्यांनी व्यवस्थापकाला घातला दोन लाख चौतीस हजाराचा गंडा
A finance manager was robbed by four people in Nashik
नाशिक येथे फायनान्स व्यवस्थापकाला भररस्त्यात चौघांंनी लूबाडलेPudhari File Photo

ओझर, पुढारी वृत्तसेवा : ओझर टाउनशिप येथे एका फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाला लुबाडण्याची घटना मंगळवारी (दि.2) समोर आली. या प्रकरणात व्यवस्थापकाची गाडी आडवून त्याच्याकडील दोन लाख चौतीस हजार रुपये चोरट्यांनी लुटून नेले आहेत.

या बाबतची माहिती अशी, मंगळवार (दि.2) रात्री अकराच्या सुमारास भारत फायनान्स ईडसलॅड बॅकेचे व्यवस्थापक पंकज कैलास खैरनार (वय.24) हे कंपनीने वसुल केलेले पैसे बॅगमध्ये घेवून जात होते. ते नाशिक येथुन पिंपळगावला त्यांच्या दुचाकीने जात होते. रात्री अकराच्या सुमारास ओझर टाउनशिप येथील उड्डाणपुलाजवळ पुढे चार अज्ञात युवक थांबलेले. त्यापैकी दोघांनी महामार्गावरील झाडीमागून येऊन पंकज खैरनार यांची गाडी आडवली. एक जण पाठीमागून स्कुटीवर येत पंकज यांची मान पकडून पाठीवर असलेल्या बॅग इतर दोघांनी बळजबरीने काढून घेतली. आणि पंकज यांना त्यांच्या मोटरसायकलवर ढकलून देत नाशिकच्या दिशेने फरार झाले.

या प्रकरणाबाबत पंकज खैरनार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अधिक घटनेचा तपास सहा. पोलीस निरीक्षक तुषार गरूड करत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news