गावाला जायचा प्लॅन होईल सुटसुटीत ! मध्य रेल्वेतर्फे दिवाळी, छटपुजेसाठी जादा फेऱ्या

Center Railway News | मध्य रेल्वेकडून मोठी घोषणा, सण उत्सवात जादा फेऱ्या
central railway
central railway file photo
Published on
Updated on

नाशिक/देवळाली कॅम्प : दसरा, दिवाळी आणि छटपूजेसाठी मुळगावी जाणाऱ्या नागरिकांसाठी मध्य रेल्वेने अतिरिक्त रेल्वे फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई ते काजीपेट या शहरांदरम्यान दोन रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून अतिरिक्त २६ फेऱ्या चालविण्यात येतील. तसेच दादर ते काजीपेट साप्ताहिक विशेषच्या दहा फेऱ्या देण्यात येणार असून, ही विशेष गाडी बल्लारशाहमार्गे धावणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात सणांच्या पार्श्वभूमीवर मुळ गावी जाण्यासाठी तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेत मध्य रेल्वेने अतिरिक्त गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

असे आहे वेळापत्रक

  • मुंबई-काजीपेट (१७ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर) - दादर येथून दुपारी ३.२५ वाजता सुटणार, दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५० ला काजीपेटला पोहचणार

  • (१६ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर) - काजीपेट येथून दुपारी ५.०५ ला सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.२५ दादरला पोहचणार

  • थांबे : कल्याण, इगतपूरी, नाशिकरोड, मनमाड, नगरसूल, रोटेगाव, लासूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतुर, सेलु, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, उमरी, धर्माबाद, बासर, निझामाबाद, आर्रमुर, मेटपल्ली, कोराटला, लिंगमपेट

  • दादर ते काजीपेट (१३ ऑक्टोबर ते १ डिसेंबर दर रविवारी)

  • -दादर येथून दुपारी ३.२५ वाजता सुटणार, दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० ला काजीपेटला पोहचेल

  • (१२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दर शनिवारी)

  • काजीपेट येथून सकाळी ११.३० ला सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.२५ दादरला पोहचणार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news