Green Nashik : 'हरित नाशिक उपक्रम' मोहिमेचा उद्या प्रारंभ

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थिती पहिल्या टप्प्यात हजार रोपांची लागवड
नाशिक : मखमलाबाद परिसरातील कॅनॉल लगतच्या सर्वे नंबर ६९ येथे वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेले खड्डे.
नाशिक : मखमलाबाद परिसरातील कॅनॉल लगतच्या सर्वे नंबर ६९ येथे वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेले खड्डे. (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : 'हरित नाशिक' या संकल्पनेवर आधारित 'हरित नाशिक' मोहिमेचा सोमवारी (दि.१५) सकाळी ९ वाजता शुभारंभ करण्यात येणार आहे. मखमलाबाद परिसरातील कॅनॉल लगतच्या सर्वे नंबर ६९ या नाशिक महानगरपालिकेच्या हरित पट्ट्यातील सुमारे अडीच एकर जागेवर तसेच गोदावरीच्या किनारी सुयोजित प्रकल्पालगत एकत्रितपणे सुमारे एक हजार विविध देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाद्वारे देण्यात आली. मंत्री महाजन यांच्या पुढाकारातून आंध्र प्रदेशातील गोदावरीच्या अंतिम भागात असलेल्या राजामुंद्री येथील नर्सरीमधून देशी प्रजातीची १० ते १५ फूट उंचीपर्यंतची झाडे शहरात उपलब्ध झालेली आहेत. टप्प्याटप्प्यातून एकूण १५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, सीएसआर व लोकसहभागातून सदर वृक्ष उपलब्ध झालेली आहेत. सदर वृक्षांच्या लागवडी व संवर्धनाकरिता देखील विविध सामाजिक संघटना, अध्यात्मिक संस्था व एनजीओ यांचा सहभाग असणार आहे. 'हरित नाशिक' मोहिमेच्या कार्यक्रमात वृक्षारोपणासाठी जास्तीत जास्त नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विविध संघटना व संस्थांमार्फत करण्यात आले आहे.

नाशिक : मखमलाबाद परिसरातील कॅनॉल लगतच्या सर्वे नंबर ६९ येथे वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेले खड्डे.
Nashik Tapovan Tree Cutting : वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाची स्थगिती
राेप लागवडीसाठी आणखी एक हजार रोपे घेवून आलेला ट्रक.
राेप लागवडीसाठी आणखी एक हजार रोपे घेवून आलेला ट्रक. (छाया : हेमंत घोरपडे)

लोकसहभागासाठी 'हरित नाशिक' ॲप

'हरित नाशिक' मोहिमेअंतर्गत अधिक संख्येने लोकसहभागातून वृक्षारोपण व्हावे, याकरिता डिजिटल ॲपच्या माध्यमातून लोकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. याकरिता 'हरित नाशिक' नावाच्या मोबाईल ॲपचे देखील उद्घाटन सोमवारी (दि.१५) करण्यात येणार आहे. या ॲपद्वारे नाशिककरांना त्यांच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यासाठी नाव नोंदणी करता येईल. २५ पेक्षा अधिक वृक्ष लागवड एखाद्या संस्था किंवा व्यक्तीमार्फत त्यांच्या उपलब्ध जागेनुसार मागणी करण्यात आल्यास त्यांना प्रशासनामार्फत झाडे उपलब्ध करून दिले जातील.

आणखी एक हजार रोपे नाशिकमध्ये

आंध्रप्रदेशातील राजामुंद्री येथील नर्सरीमधून १० ते १५ फुट उंचीचे तब्बल ३०० रोपे शुक्रवारी (दि.१२) नाशिकमध्ये आणण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी (दि.१३) तब्बल एक हजार रोपांची दुसरी खेप नाशिकमध्ये आणली गेली. सोमवारी 'हरित नाशिक' या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार असून, नाशिकमधील विविध भागांमध्ये तब्बल १५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news