

सिन्नर (नाशिक) : तालुक्यातील क्रीडारसिकांसाठी उत्साहाचा अनोखा जल्लोष ठरणार्या सिन्नर टेनिस प्रीमिअर लीग (एसटीपीएल) च्या 8 व्या पर्वाचा दिमाखदार प्रारंभ सोमवारी (दि. 15) करण्यात आला.
सिन्नर टेनिस प्रीमिअर लीग व सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. 15 ते 25 डिसेंबरदरम्यान होणार्या या स्पर्धेचे सामने शहरातील आडवा फाटा येथील वंजारी समाज मैदानावर खेळविले जाणार आहेत. ही स्पर्धा फक्त सिन्नर तालुक्यातील खेळाडूंसाठी असून, तालुक्यातीलच खेळाडूंना सहभागाची संधी देण्यात आली आहे. अनेक क्रीडाप्रेींनी मदतीचा हात पुढे केल्यामुळे ही स्पर्धा सिन्नर तालुक्याचे नाव उज्ज्वल करणारी ठरणार आहे. युवकांध्ये वाढत असलेल्या क्रीडा संस्कृतीचे हे प्रतीक असून, यंदा खेळाची गुणवत्ता व उत्साह अधिक वाढणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
तालुकास्तरीय संघ असा..
गणित गुरू (निमगाव), मोहकिंग (मोह),
मळहद्द सुपर किंग (सिन्नर), गावठाण
पार्टनर, शिवडे डेअर डेव्हिल्स, गुळवंच
नाइट रायडर्स, कुंदेवाडी. लायन्स,
मुसळगाव इंडियन्स, वडांगळी सुपर किंग्ज,
रॉयल चॅलेंजर (वडझिरे), महात्मा लेजंड
(सिन्नर), आटकवडे वॉरियर्स, यूके
बादशाह, (दोडी), डुबेरे स्ट्रायकर.
इंडस्ट्रियल - 7 संघ
एफ.डी.सी. लिमिटेड, संगीता फार्मा प्रा.
लि., थर्मो एफिशियंट इंजिनिअर्स अॅडव्हान्स
एंजाइम प्रा. लि., श्री गणेश एंटरप्रायझेस,
व्हेरिटास/मायलॅन, एच.यू.एल./हूल.
प्रोफेशनल - 7 संघ
डॉक्टर्स, राइट टाइट द्वारकाधीश, मायलॅन
2, एमआयडीसी-एमएसएमई, टीचर्स,
फार्मासिस्ट, छत्रपती वॉरियर्स.
आकर्षक बक्षिसे
स्पर्धेतील विजेत्या संघाला 1 लाख 21
हजार रुपये, उपविजेत्या संघाला 71 हजार
रुपये, तृतीय क्रमांकाला 51 हजार रुपये,
तर चतुर्थ क्रमांकाच्या संघाला 41 हजार
रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहे.