

नाशिक : येथील गुरु गोविंद सिंह अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय, नाशिक येथील प्रा. तेजश्री अभिजित कुलकर्णी यांना संदिप विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. कॅल्शियम कार्बाइड अवशेषाने उपचार केलेल्या विस्तारीत मातीचे भौतिक-रासायनिक व अभियांत्रिकी गुणधर्म हा त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय होता
तेजश्री यांनी त्यांचे संपूर्ण संशोधनकार्य प्रो. डॉ. महेश एंदईत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. डॉ. तेजश्री सांबरे - कुलकर्णी यांचे परिश्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम व विभागप्रमुख डॉ. व्ही.एम. नटराज यांनी विशेषतः गौरवले. महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापकांनीही डॉ. कुलकर्णी यांचे कौतुक केले. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून हे यश प्राप्त सांबरे आणी कुलकर्णी दोन्ही परिवारांकडून तेजश्री यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.