Shikshak Bharti Pavitra Portal | शिक्षक भरतीत 4,320 उमेदवारांची रूपांतरित फेरीत शिफारस

Shikshak Bharti Pavitra Portal | पवित्र पोर्टल माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षकभरती प्रक्रियेतील मोठी अपडेट समोर आली आहे.
Pavitra Portal Teacher Recruitment
Pavitra Portal Teacher RecruitmentPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पवित्र पोर्टल माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षकभरती प्रक्रियेतील मोठी अपडेट समोर आली आहे. 'शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी -२०२५' नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या रूपांतरित फेरीची शिफारस जाहीर करण्यात आली आहे.

Pavitra Portal Teacher Recruitment
Nashik Municipal Corporation | धूरफवारणीत हलगर्जीपणा भोवला! नाशिक महापालिकेची पेस्ट कंट्रोल ठेकेदारांवर 25 लाखांची दंडात्मक कारवाई

या फेरीत ४,३२० पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यापूर्वी नियमित फेरीत शिफारस झालेल्या उमेदवारांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच मुलाखतीशिवाय निवड झालेल्या खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील समांतर आरक्षणाच्या रिक्त राहिलेल्या जागांसाठी ही रूपांतरित फेरी घेण्यात आली.

व्यवस्थापननिहाय विचार करता, जिल्हा परिषदांच्या ३,१०५, नगरपालिका व नगर परिषदांच्या ५, महानगरपालिकांच्या ४२७, आदिवासी विकास विभाग व शासकीय शाळांच्या ५२७, शासकीय विद्यानिकेतनच्या २, खासगी शैक्षणिक संस्थांच्या ३२९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस झाली आहे.

अशा प्रकारे ४,३२० पदांचा समावेश आहे. पदनिहाय आकडेवारीनुसार पहिली ते पाचवीसाठी ३,२८१, सहावी ते आठवीसाठी ६८०, नववी ते दहावीसाठी १६६, तर अकरावी ते बारावीसाठी ६३ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. शिफारस झालेल्या उमेदवारांना निवडीबाबत एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे.

उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून आपली निवड स्थिती तपासता येईल. व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादीही संकेतस्थळाच्या होमपेजवरील 'डाउनलोड' पर्यायात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Pavitra Portal Teacher Recruitment
Nashik Municipal Corporation | धूरफवारणीत हलगर्जीपणा भोवला! नाशिक महापालिकेची पेस्ट कंट्रोल ठेकेदारांवर 25 लाखांची दंडात्मक कारवाई

शिफारस झालेल्या उमेदवारांसाठी २४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर ५ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकाराशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडीबाबत आक्षेप किंवा तक्रार असल्यास शासनाने निश्चित केलेल्या तक्रार निवारण प्रक्रियेचा वापर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news