TCS महिला शोषण प्रकरण | दानिश शेखचा मोबाईल अनलॉक

TCS Nashik Case| या पार्श्वभूमीवर न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला फॉरेन्सिक लॅबमध्ये नेण्यात आले
TCS Nashik Case
TCS Nashik CasePudhari
Published on
Updated on

नाशिक : टीसीएस आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक अत्याचार व जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणात तपासाला नवी दिशा मिळाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी दानिश शेख याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याला फॉरेन्सिक लॅबमध्ये नेले. तेथे फेस आयडीच्या सहाय्याने त्याचा मोबाईल अनलॉक करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

तपासात उघड झाले की, आरोपीने मोबाईलमधील प्रत्येक ॲप्लिकेशनला स्वतंत्र पासवर्ड व फेस आयडी सुरक्षा दिली होती. त्यामुळे डिजिटल पुरावे मिळवताना एसआयटीसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला फॉरेन्सिक लॅबमध्ये नेण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणात लैंगिक शोषणासोबत धर्मांतर आणि इतर गंभीर आरोपांचीही चौकशी सुरू असून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी प्रमुख संदीप मिटके यांची टीम तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news