नाशिक : निराधार मुलांचा सांभाळ करणाऱ्या तर्पण फाऊंडेशनमधील तीन मुले व दोन मुलींनी पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसनी घातली आहे. निराधार आरक्षणातून पाचही जणांची निवड झाली.
लहानपणापासून आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुला-मुलींसाठी भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांच्या तर्पण संस्थेमार्फत आधार दिला जातो. शिक्षण देण्यासोबतच त्यांना स्पर्धा परिक्षेचे धडे दिले जातात. त्यातून अभय तेली, जया सोनटक्के, सुंदरी जेसवाल, अमोल मांडवे, सुधीर चौघुले यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत गतवर्षी पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. त्यांनी वर्षभराचे खडतर प्रशिक्षण पुर्ण करीत पोलिस दलात पहिले पाऊल टाकले. त्यांच्या दीक्षांत सोहळ्यास आ. भारतीय हे सहकुटूंब हजर होते. यातील तेली या विद्यार्थ्याने प्रशिक्षणात चांगली कामगिरी करीत पारितोषिक पटकावले.
मी अनाथ असलो, तरी माझ्या आई वडिलांची जागा तर्पण फाऊंडेशनने घेतली. त्यांच्यामुळे मी स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून मी पोलिस दलात सहभागी झालो. ही संधी फक्त तर्पण फाऊंडेशन आणि अनाथांना एक टक्का आरक्षणामुळे आमच्यासारख्या अनाथांना मिळाली. या आरक्षणामुळे 70 ते 80 मुले प्रशासकीय सेवेत दाखल झाली आहेत.
अभय तेली, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक, संचालक, तर्पण फाऊंडेशन, नाशिक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये अनाथ मुलांसाठी १ टक्का आरक्षण जाहीर केले. या संवेदनशील निर्णयामुळे आमची पाच मुले पोलिस झाली आहेत.
आ. श्रीकांत भारतीय, संस्थापक, तर्पण फाऊंडेशन, नाशिक