नाशिककरांनो काळजी घ्या! महिनाभरात डेंग्यूचे १९८ नवे रुग्ण; डेंग्यूचा डंख कायम

Dengue outbreak Nashik : रुग्णसंख्येचा आकडा हजाराच्या घरात
Dengue
डेंग्यू प्राणघातक आहेPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पावसाळा अंतिम टप्प्यात आला असताना डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. आॉगस्ट पाठोपाठ सप्टेंबर महिन्यातही डेंग्यूचा डंख कायम राहिला असून गेल्या महिनाभरात १९८ नवे डेंग्यू बाधित आढळल्याने बाधितांचा एकूण आकडा ९७२ वर गेला आहे. (August followed by dengue sting continued in the month of September)

स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनिया, व्हायरल फिव्हर यासारख्या साथीच्या आजारांनी नाशिककर त्रस्त आहेत. दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणारा डेंग्यूचा उद्रेक यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत कायम आहे. यंदा मे महिन्यात शहरात डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळून आले. जूनमध्ये डेंग्यूचा उद्रेक होऊन पहिल्या आठवड्यात गोविंदनगरमधील पन्नासवर्षीय व्यक्तीचा या आजाराने बळी घेतला. जूनमध्ये डेंग्यूचे १६५ बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर जुलैत डेंग्यूचा उद्रेक बघायला मिळाला. या एकाच महिन्यात ३०७ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे

Dengue
Nashik Alert | डेंग्यू निर्मूलनासाठी महापालिका फ्रंटफूटवर

उपाययोजना सुरू

महापालिकेने डेंग्यू नियंत्रणासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या. ट्रॅक्टरद्वारे धूरफवारणी करीत घरोघरी तपासणी मोहीम राबविली, तरीही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या नियंत्रित होत नसल्याचे चित्र आहे. ऑगस्टमध्ये १९८ रुग्ण आढळले असतानाच सप्टेंबरमध्येही डेंग्यूचा उद्रेक कायम राहिला. सप्टेंबर मध्ये १९८ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जानेवारीपासून आतापर्यंत शहरातील डेंग्यूबाधितांचा आकडा हा ९७२ पर्यंत पोहचला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news