Nashik Crime News | आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या टाकळीच्या सावकाराला बेड्या

Nashik Crime News | ही कारवाई नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाने टाकळी गाव परिसरात सापळा रचून केली.
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिवे ठार मारण्याच्या धमक्या देत बेकायदेशीर सावकारीचा जाच वाढवून एका तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुंडाविरोधी पथकाने भारत रामदास लोखंडे (३१, रा. वैदुवाडी, शिंदे गल्ली, आगर टाकळी) यास शिताफीने अटक केली. ही कारवाई नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाने टाकळी गाव परिसरात सापळा रचून केली.

Arrest
Nashik BJP | काही तासांत सुनील केदारांचा 'यू टर्न'

या प्रकरणी फिर्यादी श्वेता संदीप फुलसुंदर (रा. आगरटाकळी, टाकळी गाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सन २०२२ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत संशयित भारत लोखंडे याने त्यांचे पती संदीप फुलसुंदर यांनी घेतलेल्या एक लाख रुपयांच्या बदल्यात वारंवार फोन करून व्याजाची मागणी केली.

पैसे न दिल्यास संदीप व त्यांच्या कुटुंबास जिवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. तसेच व्याजाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून भारत लोखंडे व त्याचे २ ते ३ साथीदार यांनी संदीप यांना हाताचापटीने मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून संदीप फुलसुंदर यांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात ३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानुसार पोलिस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत लोखंडे टाकळी गाव परिसरात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठांना कळवून सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पथकाने टाकळी गाव, वैदुवाडी परिसरात सापळा रचत संशयितास ताब्यात घेतले.

Arrest
Girish Mahajan Protest | 'महाजन हटाओ, नाशिक बचाओ'; जलसंपदामंत्र्यांविरोधात संविधानप्रेमींचा आक्रोश मोर्चा

लोखंडेला पुढील तपासासाठी उपनगर पोलिस ठाणे, नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण व सहा. पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकातील सहा.

पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे व घनश्याम महाले यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news