नाशिक : विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आता अवघ्या जिल्हावासीयांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून, शनिवारी (दि. २३) सकाळी ८ पासून पंधराही मतदारसंघांत मतमोजणीस प्रारंभ होईल. त्यासाठीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
यंदा जिल्ह्यातील ६९.१२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. १९६ उमेदवारांचे भवितव्य 'ईव्हीएम'मध्ये बंदिस्त झाले आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा जिल्ह्यात ६.५२ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. बुधवारी (दि. २०) मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या-त्या मतदारसंघात उभारण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम सुरक्षितरीत्या जतन करण्यात आले आहे. शनिवारी मतमोजणीच्या दिवशी सकाळी ८ वाजता या स्ट्राँगरूम उघडल्या जाणार आहेत. मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिले असून, जिल्ह्याला नव्याने कोणते १५ आमदार लाभणार याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.
नांदगाव : अतिरिक्त प्रशासकीय इमारत, नवीन तहसील कार्यायल इमारत, नांदगाव
मालेगाव मध्य : शिवाजी जिमखाना, संगमेश्वर, मालेगाव
मालेगाव बाह्य : शासकीय वखार महामंडळ गोदाम, मालेगाव
बागलाण : मराठा हायस्कूल, स्काउट-गाइड हॉल, बागलाण
कळवण : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कळवण
चांदवड : नवीन प्रशासकीय इमारत, आयटीआय रोड, चांदवड
येवला : पैठणी क्लस्टर गोदाम औद्योगिक वसाहत, एमआयडीसी, अंगणगाव, येवला
सिन्नर : तहसील कार्यालय, सिन्नर
निफाड : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, निफाड
दिंडोरी : मविप्र कॉलेज, दिंडोरी
नाशिक पूर्व : मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, नाशिक
नाशिक मध्य : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, नाशिक
नाशिक पश्चिम : राजे छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम, सिडको, नाशिक
देवळाली : जिल्हा निवडणूक गोदाम, सय्यदपिंप्री, ता. नाशिक
इगतपुरी : शासकीय कन्या विद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, सीबीएस, नाशिक