Swapnil Kusale Bronze Medal Olympic | 'स्वप्नील' यश नाशिकमुळेही 'मूर्तीमंत'

Swapnil Kusale : नेमबाज स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक, यशात नाशिकचाही वाटा; शहरात जल्लोष
Swapnil Kusale Bronze Medal Olympic
नाशिक : पंचवटतील हिरे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना क्रीडा स्पर्धेतील यशाबद्दल अभिनंदन करताना प्राचार्य जगदाळे, समवेत उपप्राचार्य डॉ. मृणाल भारव्दाज.pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic Games 2024) नेमबाजी क्रीडा प्रकारात कांस्यपदकावर नाव कोरले. स्वप्नीलचे शिक्षण आणि नेमबाजीतील प्रशिक्षण नाशिकमध्ये झाल्याने त्याचे विजयात नाशिकचाही वाटा आहे. त्याच्या यशाने नाशिक क्रीडा जगतातही मानाचा तुरा रोवला गेला असून या विजयाचा गुरुवारी (दि.१) नाशिकमध्येही जल्लोष करण्यात आला. (Nashik also has a share in Swapneel Kusale's victory. His success has earned him respect in the sports world of Nashik as well)

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचा स्वप्निल कुसळे हा माजी विद्यार्थी आहे. त्याने पंचवटी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. सन २०१२ ते २०१४ या काळात तो महाविद्यालयाचा विदयार्थी होता. स्वप्निलने नववी ते प्रथम वर्ष पदवी पर्यंतचे शिक्षण भोसला संस्थेत पूर्ण केले होते. त्यानंतर आंतरशालेय, महाविद्यालयीन, जिल्हा, राज्य आणि विद्यापीठ स्तरावरून झेप घेत स्वप्नील पन्नास मीटर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. पॅरिस ऑलिम्पिक मधील थ्री पोझिशनिंग ५० मीटर स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्वप्निलला नेमबाजी कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. या फेरीत त्यांनी सर्वोत्तम कामगिरी करत कांस्य पदकावर नाव कोरले. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्वप्निल कडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करत स्वप्निलने यशाला गवसणी घालत कांस्य पदकाची कमाई केली.

दरम्यान, त्याच्या खेळातील प्राविण्य, गती आणि मेहनत बघता नाशिक क्रीडा प्रबोधिनीत त्याची निवड झाली. तिथेही त्याने महेनतीच्या जोरावर आपला ठसा उमटवला. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल स्वप्नील कुसळे यांच्या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सरचिटणीस डॉ. प्रशांत हिरे, कोषाध्यक्षा डॉ. स्मिता हिरे, संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व प्रशांत हिरे, डॉ. संपदा हिरे, डॉ. अद्वय हिरे, डॉ. योगिता हिरे, प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी अभिनंदन केले. एकूणच त्याच्या यशात नाशिकचा मोठा वाटा असल्याने नाशिककरांनी त्याचे यश जल्लोष करुन साजरा केले.

संस्थेचा विद्यार्थी असल्याचा अभिमान स्वप्नील कुसळे यांनी मिळवलेले यश देशासाठी प्रेरणादायी आहे. तो आमच्या संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाने उंचावले आहे. त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत संस्थेच्या वतीने हे यश साजरे करणार असून या पदकवीराच्या स्वागताची जय्यत तयारी करणार आहोत.

डॉ. अपूर्व हिरे, संस्था समन्वयक, महात्मा गांधी विद्यामंदीर, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news