सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे तीन धक्के, ३.७ रिश्टरचा धक्का; गत १५ दिवसांत १८ हादरे

सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे तीन धक्के, ३.७ रिश्टरचा धक्का; गत १५ दिवसांत १८ हादरे
Earthquake
Earthquake
Published on
Updated on

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मंगळवारी (दि. १) दुपारी भूकंपाचे तीन सौम्य धक्के जाणवले. हरणटेकडी परिसरात जाणवलेल्या पहिल्या धक्क्याची तीव्रता ३.७ रिश्टर, तर शिंदे पाडा परिसरात जाणवलेल्या दुसऱ्या धक्क्याची तीव्रता २.५ रिश्टर इतकी नोंदविण्यात आली. दोन्ही भूकंपांचे केंद्रबिंदू जमिनीखाली पाच किलोमीटरवर होते. पहिला धक्का दुपारी २.४३ मिनिटांनी, तर दुसरा धक्का सुमारे ३.१२ वाजता बसला, तर तिसरा धक्का दुपारी ३ वाजून ५८ मिनिटांनी हिरडीपाडा येथे जाणवला.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंफोटो - २ सप्टेबर सीटी १ भूकंपद्राच्या नोंदीनुसार, पहिल्या भूकंपाचे केंद्र २०.४७३ उत्तर अक्षांश व ७३.७२२ पूर्व रेखांश म्हणजे हरणटेकडी परिसरात तर, दुसऱ्या भूकंपाचे केंद्र २०.४२४ उत्तर अक्षांश व ७३.६८६ पूर्व रेखांशावर म्हणजे शिंदे पाडा परिसात होते. सलग दोन धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा चिंता निर्माण झाली आहे. तिसऱ्या भूकंपाचा केंद्रबिंदू २०.४९१ उत्तर अक्षांश व ७३.७४७ पूर्व रेखांशावर आढळला आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाची मालिका सुरू असून, गत १५ दिवसांत १८ धक्के नोंदविण्यात आले आहेत. यापूर्वी रविवारीही सुरगाणा परिसरात सौम्य धक्के जाणवले होते. त्यापूर्वी ८ ऑगस्टला रात्री जाणवलेला ४.३ रिश्टर स्केलचा धक्का आतापर्यंतचा सर्वाधिक तीव्र धक्का ठरला होता. सुरगाणा, पेठ, दिंडोरी आणि कळवण परिसरात यापूर्वीही सातत्याने हादरे जाणवले आहेत.

या भूकंप मालिकेकडे प्रशासन आणि राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राचे विशेष लक्ष आहे. सुरगाणा तहसील कार्यालयात ब्रॉडबँड सिस्मोग्राफ कार्यान्वित करण्यात आला असून, भूकंपीय हालचालींची रिअल-टाइम नोंद घेतली जात आहे. दरम्यान, या परिसरातील बेसॉल्ट खडकांच्या हालचालींमुळे भूकंपीय कंपन निर्माण होत असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पिंपरी परिसरात ३.३ रिश्टर स्केलचा धक्का

महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील जळगाव जिल्ह्यातील पिंपरी परिसरातही मंगळवारी (दि. १) सकाळी सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी ३.३ रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश २१.३३२ आणि रेखांश ७६.०७१ म्हणजेच पिंपरी असून, त्याची खोली ५ किलोमीटर इतकी नोंदविण्यात आली. सीमावर्ती पिंपरी परिसरासह लगतच्या भागात या भूकंपाची सौम्य कंपने जाणवल्याची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news