Surat Chennai Highway | नाशिककरांसाठी मोठी बातमी! सुरत-चेन्नई महामार्गाच्या कामाला अखेर मुहूर्त

Surat Chennai Highway | अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या बहुप्रतीक्षित सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाच्या कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Highway
HighwayPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : निखिल रोकडे
अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या बहुप्रतीक्षित सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाच्या कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या महामार्गाच्या उभारणीसाठी नोव्हेंबरअखेर निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली जाणार असून, जानेवारी २०२७ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Highway
Nashik Kumbh Mela 2027 | नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याआधी मोठी मागणी! साधुग्राममधील कोट्यवधींची जागा आखाड्यांना हवी मोफत

त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील दळणवळणाचे चित्र बदलणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या महामार्गाचे काम नाशिकच्या आडगाव परिसरातून सुरू होऊन अहिल्यानगरपर्यंत जाणार आहे.

नाशिक ते अहिल्यानगर दरम्यान सुमारे १५२ किलोमीटरचा टप्पा महामार्ग विभागाच्या नाशिक कार्यक्षेत्रात येतो. त्यापुढे अहिल्यानगर ते सोलापूर असा सुमारे २०० किलोमीटरचा दुसरा टप्पा विकसित केला जाणार आहे. अशा प्रकारे दोन्ही टप्प्यांतील एकूण ३५२ किलोमीटरच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नाशिक आणि सोलापूर येथे स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबरअखेर निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर डिसेंबरअखेर कोणत्या कंत्राटदाराला काम मिळाले, याचे चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, प्रस्तावित महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाचा प्रश्न आणि प्रशासकीय प्रक्रियांबुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्प रखडला होता.

मात्र, आता शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे. या महामार्गाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्यात आला असून, पुढील महिन्यात त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे.

नाशिक-सोलापूर प्रवासात मोठी बचत

या महामार्गामुळे नाशिक ते सोलापूरदरम्यानचे अंतर तब्बल १३५ किलोमीटरने कमी होणार आहे. तसेच सुरत ते चेन्नईदरम्यानचे अंतर सुमारे ३२० किलोमीटरने, तर दिल्ली ते चेन्नईदरम्यानचे अंतर सुमारे ३५० किलोमीटरने कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ, इंधन आणि वाहतूक खर्चात मोठी बचत होणार आहे.

सहा राज्यांना जोडणारा महत्त्वाकांक्षी मार्ग

सुमारे १,६०० किलोमीटर लांबीचा हा ग्रीनफिल्ड महामार्ग गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या सहा राज्यांतून जाणार आहे. सुरत, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, कलबुर्गी, कर्नूल, कडप्पा आणि तिरुपती ही महत्त्वाची शहरे या मार्गाने जोडली जाणार आहेत. त्यामुळे औद्योगिक मालवाहतूक, व्यापार, कृषी उत्पादनांची वाहतूक आणि आंतरराज्यीय प्रवासाला मोठी चालना मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या महामार्गाच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाल्यास नाशिकच्या विकासाला नवे दालन खुले होणार आहे.

Highway
Nashik Municipal Corporation | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली अडीच कोटींची कामे विनानिविदा; नाशिक महापालिकेचा निर्णय चर्चेत

९९६ हेक्टर जमीन अधिग्रहण

नाशिक जिल्ह्यात या महामार्गाची प्रस्तावित लांबी सुमारे ७६ किलोमीटर असून, सुरगाणा तालुक्यातील राक्षसभुवन येथून मार्गाची सुरुवात होणार आहे. पुढे पेठ, दिंडोरी, निफाड, नाशिक आणि सिन्नरमार्गे हा महामार्ग अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. जिल्ह्यात सुमारे ९९६ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण आवश्यक आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ४२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ४ हजार २३१ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.