

नगरसूल : येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनील निकम यांची बिनविरोध निवड झाली.
आवर्तन पद्धतीनुसार दत्तात्रय पैठणकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी येवल्याच्या सहकार अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नेहा भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालकांची बैठक घेण्यात आली. त्यात अध्यक्षपदासाठी सुनील दामोदर निकम यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सोसायटीचे सचिव गणेश वाकचाैरे यांनी सहकार्य केले. यावेळी ॲड. मंगेश भगत, सुनील पैठणकर, विकास निकम, सोसायटीचे उपाध्यक्ष अनिल कांडेकर, संचालक प्रभाकर कुडके, सुभाष निकम, आनंदा सोनवणे, संभाजी बोरसे, बाळू खैरनार, शिवाजी कमोदकर, प्रणाली अभंग, मनीषा जाधव, गोपाळ धनवटे, धनाजी पैठणकर, भाऊराव फरताळे, अरुण धनवटे,सह खंडू महाले, काशिनाथ रावते ,सजन कुडके ,ऋषी निकम ,बापू निकम ,निलेश निकम सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळन व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.