Sundarnarayan Temple Nashik | सुंदरनारायण मंदिर जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात

Sundarnarayan Temple Nashik | पेशवेकालीन वारशाचे वैभव असलेल्या राज्य संरक्षित श्री सुंदरनारायण मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
Sundarnarayan Temple Nashik
Sundarnarayan Temple Nashik
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पेशवेकालीन वारशाचे वैभव असलेल्या राज्य संरक्षित श्री सुंदरनारायण मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबरअखेर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे यांनी दिली. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत सुरू असलेल्या मंदिर संवर्धनासाठी केंद्र सरकारने सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

Sundarnarayan Temple Nashik
Nashik Pune Direct Railway Route: नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गासाठी 9 ऑगस्टला क्रांतिदिनी रास्ता रोको; संगमनेरात हिवरगाव पावसा टोल नाक्यावर आंदोलन

मंदिर संवर्धनाचे काम गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. सुरुवातीला मूर्तींचे तात्पुरते स्थानांतर, जागेच्या अडचणी, कोरोनामुळे निर्माण झालेला खंड, परप्रांतीय कारागिरांचे स्थानांतर तसेच बांधकामासाठी आवश्यक दगड उपलब्ध करण्यात आलेल्या अडचणींमुळे विलंब झाला.

मात्र, या सर्व अडचणींवर मात करत २०२३ मध्ये जीर्णोद्धाराचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला होता. यात मंदिराच्या शिखरावरील कळसाची शास्त्रोक्त विधीनुसार पुनर्रस्थापना करण्यात आली. कळसातून पूर्वी मिळालेले टाक, कलश आणि नाण्यांची पूजा करत ती पुन्हा कळसामध्ये स्थापित करण्यात आली.

Sundarnarayan Temple Nashik
Maharashtra Flood Relief | राज्यात अतिवृष्टी, पूरबाधितांना मदतीचा ओघ सुरुच; राज्य सरकारकडून ६४८ कोटी रुपयांचा आणखी निधी मंजूर

सध्या गर्भगृह, सभामंडप, शिखरावरील सूक्ष्म शिल्पकाम आणि परिसर सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. संपूर्ण काळ्या पाषाणात उभारलेल्या या मंदिराचे मूळ स्थापत्यवैभव जपण्यासाठी दक्षिण भारतातील कुशल कारागीर पारंपरिक पद्धतीने दगडी शिल्पकलामागील कलाकृतीतून मंदिराचे वैभव जपण्याचे कौशल्य पणाला लावत आहेत.

आगामी २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या ऐतिहासिक मंदिराचे संवर्धन प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहे. डिसेंबरअखेर भाविकांना मंदिराचे दर्शन पुन्हा उपलब्ध होणार आहे.

"मंदिराचे काम होत आले असून, बाह्य भागाचे काम पूर्णत्वास आले आहे. आमचा प्रयत्न आहे की, येत्या दिवाळीपर्यंत मंदिराचे संपूर्ण काम पूर्ण होऊन भाविकांना मंदिर खुले करून देण्यात येईल. त्यानंतर कुंभमेळापूर्वी शासनस्तरावर मूर्ती स्थापनेचे काम हाती घेतले जाणार आहे."

- अमोल गोटे, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग

"कोरोनापूर्वीपासून मंदिराचे काम सुरूच असून, या ऑगस्ट महिन्यात मंदिर ताब्यात देणार होते. मंदिर संवर्धन कामाबरोबरच देवांच्या मूर्तींचे कोरीव काम अजून बाकी आहे. मंदिराशेजारीच एका खोलीमध्ये देवांच्या पवित्र मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. सिंहस्थापूर्वी लवकरात लवकर मंदिराचे काम पूर्ण व्हावे, असे अपेक्षित आहे."

- अमेय गुरुजी, पुजारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news