Suhas Kande : एकनाथ शिंदेंनी सुहास 'अण्णां'ची ताकद वाढवली

'प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख 'पदावर नियुक्ती ; नाशिकमध्ये मोठी जबाबदारी
nashik
नाशिक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तपत्र स्वीकारतांना आमदार सुहास कांदे. समवेत पदाधिकारी.Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : शिवसेनेचे मुख्य नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांची 'प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख ' पदावर नियुक्ती केली आहे. पक्ष संघटनेत या पद नव्याने स्थापन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी, आणि राम रेपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. कांदे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

शिवसेनेच्या संघटन रचनेत प्रथमच ‘प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख’ हे पद निर्माण करण्यात आले असून, हे पद सर्व जिल्हा प्रमुखांच्या वरच्या स्तरावरचे मानले जात आहे. आगामी नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना अधिक बळकट करणे, रणनीती आखणे व कार्यपद्धती एकसंध करणे या उद्देशाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली असल्याचे बोलले जात आहे.

nashik
MLA Suhas Kande : पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी आ. सुहास कांदे सरसावले

ही नियुक्ती केवळ पद नाही, तर प्रत्येक शिवसैनिकाच्या त्यागाचा आणि निष्ठेचा सन्मान आहे. नाशिक जिल्हा शिवसेनेचा गड आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा आधार घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा फडकवू. शिवसेना ही सत्ता नव्हे, तर सेवा आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जिल्हा शिवसेनेच्या संघटनशक्तीचे आदर्श उदाहरण बनवू.

आ. सुहास कांदे. प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख, शिवसेना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news