Cardiac Surgery Case | नाशिकमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील किमया! छातीचे हाड न कापता 18 वर्षीय मुलीवर यशस्वी हृदयशास्त्रक्रिया

Cardiac Surgery Case | अशोका मेडिकोव्हर हॉस्पिटलचा विक्रम; ओपन हार्ट सर्जरीनंतर अवघ्या 24 तासांत रुग्णाला डिस्चार्ज!
Cardiac Surgery Case
Cardiac Surgery Case
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जन्मजात हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकोव्हर हॉस्पिटलमध्ये आधुनिक मिनिमल इन्व्हेसिव्ह ओपन हार्ट सर्जरी यशस्वीपणे करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या २४ तासांत रियाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज देण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे.

Cardiac Surgery Case
Nashik Malnourished Children | नाशिक जिल्ह्यात 3,672 बालके कुपोषित; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्मूलनाचे कडक आदेश!

रियाला 'सायनस व्हेनोसस प्रकारचा एट्रियल सेप्टल डिफेक्ट आणि त्यासोबत पार्शियल ॲनोमलस पल्मोनरी व्हेनस कनेक्शन' हा जन्मजात हृदयरोग होता. या विकारामध्ये हृदयाच्या वरच्या कप्प्यांमधील पडद्यात छिद्र असण्याबरोबरच फुफ्फुसातून येणारी रक्तवाहिनी हृदयाला असामान्य ठिकाणी जोडलेली असते.

या आजारासाठी सामान्यतः पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीची आवश्यकता भासू शकते. मात्र, रियाच्या बाबतीत आधुनिक मिनिमल इन्व्हेसिव्ह तंत्राचा वापर करण्यात आला. या प्रक्रियेत छातीच्या मध्यभागी असलेले छातीचे हाड न कापता, छातीच्या उजव्या बाजूने दोन बरगड्यांच्याामधून छोट्या छेदाद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली.

Cardiac Surgery Case
ICU NICU Safety Audit | अमरावती दुर्घटनेनंतर नाशिक प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; सर्व रुग्णालयांना फायर अन् इलेक्ट्रिकल ऑडिटचे आदेश!

या तंत्रामुळे मोठी जखम टाळता येते. त्याचबरोबर लहान व कॉस्मेटिक व्रण, तुलनेने कमी वेदना व रक्तस्त्राव, संसर्गाचा कमी धोका आणि जलद रिकव्हरी असे फायदे मिळू शकतात. रियाची शस्त्रक्रियेनंतरची प्रकृती स्थिर राहिली आणि वैद्यकीय निकषांनुसार २४ तासांच्या आत तिला घरी पाठविण्यात आले.

डॉ. प्रणव माळी यांनी सांगितले, निवडक रुग्णांमध्ये मिनिमल इन्व्हेसिव्ह तंत्रज्ञानामुळे पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीच्या तुलनेत शस्त्रक्रियेनंतरचा त्रास कमी करण्यास आणि रिकव्हरीला गति देण्यास मदत होते.

रियाच्या बाबतीत शस्त्रक्रियेनंतरची रिकव्हरी अत्यंत समाधानकारक झाली. अशोका मेडिकोव्हरचे सेंटर हेड अनुप त्रिपाठी यांनी सांगितले, रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुरक्षित सुविधा देण्यावर रुग्णालयाचा सातत्याने भर आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी डॉ. प्रणव माळी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. शर्वरी, विवेक पॉल, समाधान व विशाल आदी टीमने प्रयत्न केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news