Success Story Small Village Entrepreneur | 'शबरी'चा लाभ ठरतोय वरदान

'शबरी वित्त विकास महामंडळा' च्या मदतीने गावातील युवकाने उभारली कंपनी
Shabari Adivasi Vitta Va Vikas Mahamandal Nashik.
नाशिक : शबरी वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून कुरुसवाडी गवातील तरुणांनी स्थापन केलेली सीएससी फार्मर प्रोड्युसर कंपनी.pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : साक्री तालुक्यातील जेमतेम 950 लोकवस्तीचे कुरुसवाडी गाव. या गावातील किरण पवार या उद्योजकाने इतर 10 अल्पशिक्षित लोकांना सोबत घेऊन सीएससी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. स्थापनेपासूनच आदिवासी नागरिकांसाठी कार्यरत असणार्‍या 'शबरी वित्त विकास महामंडळा'ने मदतीचा हात दिल्याने या कंपनीने दहा महिन्यांतच 50 लाखांहून अधिकचा टर्नओव्हर केला आहे. पुढील वर्षात आणखी प्रगती करण्याचा मानस या कंपनीचा आहे. (Kuruswadi by Kiran Pawar, an entrepreneur In this small village he established CSC Farmer Producer Company along with 10 other less educated people.)

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आदिवासी पाड्यांच्या बाजूला असलेल्या सीएससी फार्मर प्रोड्युसर कंपनीला शबरी वित्त व विकास महामंडळाने अनुदान देत मदतीचा हात दिला. बैलांच्या साहाय्याने पूर्वीच्या काळी शेतात पिकविलेली नागलीची मळणी केली जात होती. आता ट्रॅक्टर आल्याने त्याच्या सहाय्याने मळणी केली जाते त्यामुळे भुशाचे प्रमाण जास्त राहत आहे.

या कंपनीने आजूबाजूच्या शेतात पिकत असलेली नाचणी (नागली) विकत घेतली. बाजारभावापेक्षा दोन रुपये ते पाच रुपये जास्त देऊन तसेच शेतकर्‍यांना गोणी आणि वाहतूक खर्चातून मुक्त करण्याची व्यवस्था केल्याने शेतकर्‍यांनी आनंदाने ही नाचणी दिली. याच नाचणीच्या माध्यमातून पापड बनविण्याचे तंत्र विकसित केले आणि साक्री तालुक्यातील महत्त्वाचा असा नागली पापड उद्योग सुरू झाला त्यामुळे विभागात त्यांचे नाव झाले आहे.

कंपनी स्थापन केली मात्र पुढे काय करावे याची माहिती नव्हती. शबरी वित्त व विकास महामंडळाने केलेली मदत, दिलेले मार्गदर्शन आणि आधार या गोष्टी कंपनीच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरल्या.

किरण पवार, संचालक सीएससी धुळे आदिवासी फार्मर प्रोड्युसर कंपनी, साक्री, धुळे.

खरेदी करण्यात आलेली नागली

शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत 140 टन नागलीची खरेदी करण्यात आली. त्यापैकी 70 ते 80 टन नागलीची विक्री 33 रुपये प्रतिकिलोप्रमाणे करण्यात आली.

कंपनीला निधी वितरित

शबरी महामंडळाच्या माध्यमातून 1 कोटी 12 लाख इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी 1 कोटी 05 लाख रुपयांचा निधी कंपनीला वितरित करण्यात आला आहे.

तब्बल 310 भागधारक

कंपनीने आता आजूबाजूचे सर्व शेतकर्‍यांना कंपनीचे भागधारक करून जोडून ठेवले आहे. त्यामुळे कंपनीचे काम येत्या दोन वर्षांत 2 कोटींच्या आसपास टर्नओव्हर होणार असल्याचा विश्वास संचालकांनी व्यक्त केला आहे.

शबरी महामंडळाने कृषी उत्पादक कंपन्यांना कमी व्याजदराने कर्ज दिले आहे. तसेच वेळोवेळी त्यांचे प्रशिक्षणदेखील महामंडळाच्या वतीने घेण्यात येतात. त्यामुळे त्यांना काम करताना अडचणी कमी येत आहे. अशा उत्पादक कंपन्यांमधून तयार होणारे उत्पादनांचा एक ब्रँड विकसित केला जाणार आहे. तसेच विक्रीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच आपण जागतिक बाजारपेठेत विक्री करण्यासाठी तयार असणार आहोत.

लीना बनसोड (भा.प्र.से.) व्यवस्थापकीय संचालक, शबरी वित्त व विकास महामंडळ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news