

मालेगाव : महापालिका निवडणुकीत मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी मनपातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासाठी शहरात मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थी मानवी साखळी करण्यात आली. या उपक्रमात शहरातील २०० हून अधिक शाळांच्या सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. उपायुक्त पल्लवी शिरसाठ यांनी हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचे उद्घाटन केले.
विद्यार्थी मानवी साखळी उपक्रम यशस्वी, शिस्तबद्ध व सुरक्षितपणे राबविण्यासाठी शालेय विद्याथ्यर्थ्यांच्या नियोजनासाठी पूर्वतयारी, परवानगी, विद्यार्थ्यांचे वर्गीकरण, ठिकाण, मार्ग नियोजन, संख्या, अंतर नियोजन, सुरक्षा व्यवस्था, शिस्त, सूचना, वेळेचे नियोजन, आपत्कालीन व्यवस्थापन, नोंद व समारोप आदींचा समावेश होता.
विद्यार्थी मानवी साखळीचा मार्ग महानगरपालिका मुख्यालय, भुईकोट किल्ला, रामसेतू कॉर्नर, गूळ बाजार, सरदार चौक, नंदन टॉवर, किदवाई रोड, संविधान चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल, श्री दत्त मंदिर, महादेव मंदिर, या. ना. जाधव विद्यालय, मोसम पूल, न्यायालय, राष्ट्रीय एकात्मता चौक,कॉलेज स्टॉप, डॉ. सांवत हॉस्पिटल, रावळगाव नाका, चर्च या मागाँवर विद्यार्थी मानवी साखळी करण्यात आली.
यात सहभागी विद्यार्थ्यांनी 'मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!', 'बोट फॉर मालेगावकर', 'माझे मत, माझा हक्क' 'माय वोट, माय फ्यूचर' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आयुक्त रवींद्र जाधव यांनी सहभागी मुख्याध्यापकांना प्रशस्तिपत्र प्रदान केले. यावेळी विद्यार्थी, मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांत उत्साह होता.
उपक्रम यशस्वीतेसाठी उपायुक्त पल्लवी शिरसाठ, प्रशासन अधिकारी तानाजी घोंगडे, लेखाधिकारी हरिष डिंबर, अग्निशमन अधीक्षक संजय पवार, रोहित कन्नोर, संदीप आगोणे, प्रभाग अधिकारी सचिन महाले, मोहम्मद इरफान, संतोष गायकवाड, कल्पना सोनपसारे, हिरकणी वाबळे, मधुर संसारे, इशरत जहाँ, संदीप वाघ, वहिदा अब्दुल जब्बार, शाहिनबानो शेख, सनी पवार, शरद पवार, राजेश बागूल, अजय पगारे, समृद्धी हिरे, अश्विनी बागूल, दर्शन सोळंकी, अरुण सुरते, अनिल सरादे, प्रदीप देवरे, शादाब अहमद, शकील अहमद आदींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.