Nashik | 'शिक्षक' मतदारसंघ मतमोजणी रोखा, अन्यथा आजपासून उपोषण

अधिकाऱ्यांना पत्र, 'शिक्षक' निवडणुकीत भ्रष्ट मार्गाचा वापर झाल्याची तक्रार
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन राजलदास चावला
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन राजलदास चावला

देवळाली कॅम्प (नाशिक) : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असून, याबाबत खुद्द नोडल अधिकारी आचारसंहिता कक्षप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी नाशिक यांनी दखल घेतलेली आहे. अनेक व्यक्तींनी केलेल्या तक्रारींनुसार ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून भ्रष्ट उमेदवारांना 15 वर्षे निवडणुकीपासून रोखावे तसेच आजची सोमवार (दि.१ जुलै) मतमोजणी थांबवावी अन्यथा निवडणूक मतमोजणी ठिकाणी उपोषण करणार असल्याचा इशारा निवडणुकीतील उमेदवार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांनी दिला आहे.

चावला यांनी नोडल अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मतदारसंघातील मतदारांना पैठणी, सफारी कापड, नथ व रोख रकमा वाटप झाले असून, याबाबत विविध दैनिकांमध्ये माहितीदेखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. दि. 23 जूनला नोडल अधिकारी राजेंद्र वाघ यांनी या तक्रारींची दखल घेत जि.प.च्या शिक्षणाधिकाऱ्यांना लिखित स्वरूपात पत्र देत शिक्षक मेळाव्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने दाखवणे हा आचारसंहितेचा भंग असल्याचे स्पष्ट केलेले आहे, तरीही या निवडणुकीत अनेक भ्रष्ट मार्गांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग करण्यात आलेला आहे. त्यामुळे आज होणारी मतमोजणी प्रक्रिया रद्द करून या निवडणुकीतील भ्रष्ट उमेदवारांना मतमोजणीमधून बाद करावे. त्यानंतर राहिलेल्या उमेदवारांची मतमोजणी करावी, अशी मागणी केली. याबाबत नोडल अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत कोणताही निर्णय दिलेला नसल्याने सोमवारी (दि. १) मतमोजणीच्या ठिकाणी आपण उपोषणास बसणार असल्याची माहिती रतन चावला यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news