महाराष्ट्र पुन्हा हादरला ! मानेवर खुरपे ठेऊन सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Nashik Crime News | संशयिताला अटक, नाशिकमधील घटना
Abuse of minor girl by father
सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचारfile photo
Published on
Updated on

ओझर (जि. नाशिक) : येथून जवळ असलेल्या दात्याने शिवारात सावत्र बापाने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिला जिवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित मुलीने आपल्या आईला सोबत घेऊन ओझर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर घटना दात्याणे शिवारात असलेल्या एका उसाच्या शेतात घडली. दत्तू कुंडलिक वाघ हा पीडितेचा सावत्र वडील असून मंगळवारी दुपारी त्याने अल्पवयीन पिडीतेस बकऱ्यांना चारा आणायला चाल असे सांगत सोबत नेत पिडीतेसोबत बळजबरी करत जवळील द्राक्षबागेत तिच्या अंगावरील वस्त्र काढण्यास सांगितले. त्याच क्षणी पिडीतेने आरडाओरडा केल्यावर दत्तू वाघ याने तिला गालात मारहाण करत ऊसाच्या शेतात ओढून नेत खाली पाडत निवस्त्र करत हातातील खुरपे गळ्यावर ठेवत तू ओरडलीस तर तुला जीवे ठार मारून विहिरीत फेकून देईल अशी धमकी देत दारूच्या नशेत असलेल्या दत्तू वाघ ने तिच्यावर अत्याचार केले.

या गंभीर घटनेची दखल घेत पीडित आणि आईने ओझर पोलीस ठाण्यात धाव घेत झालेला प्रकार सांगितला.ओझर पोलिसांनी तत्काळ दत्तू कुंडलिक वाघ रा. समता नगर,आगर टाकळी नाशिक यास बुधवारी पहाटे अटक करत गुन्हा दाखल केला. पुढील तपास ओझर पोलीस करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news