

सिडको ( नाशिक ) : राणेनगर उड्डाण पुलाचे काम सुरु असतांना स्टेस्टबँक चौक येथील चौपाटी या कामात अडथळा ठरत असल्याने ही चौपाटी हलवण्यासाठी सिडको विभागीय कार्यालयच्या वतीने उपाययोजना सुरु केली आहे. मनपाकडून पाथर्डीफाटा जलकुंभ जवळ किंवा उड्डानपुल या दोन जागांची चाचपणी सुरू असल्याची माहिती विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांनी दिली.
राणेनगर बोगद्याचे विस्तारिकरणाचे काम सुरु असून स्टेटबँक चौक येथे असलेली चौपाटी या कामात अडथळा ठरत आहे. त्यामुळे ही चौपाटी येथून हलविण्याची प्रक्रिया सिडको विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे व अतिक्रमण विभागाचे प्रमुख निखिल तेजाळे यांनी पर्यायी जागेचा शोध सुरु केला आहे. यामध्ये प्रामुख्याने महाले पेट्रोल पंपासमोरील जागा सुचविण्यात आली होती. हा कुंभमेळ्यासाठी आपत्कालीन रस्ता असल्याने अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत व वाहतूक शाखा क्रमांक तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांनी या ठिकाणी चौपाटीसाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे टोयोटा शोरूम समोरील उड्डाण पुलाखाली जागा बघण्यात आली असून साळवे व तेजाळे यांनी ही जागा मिळण्यासाठी रस्ते राष्ट्रीय प्राधिकरण विभागाशी चर्चा सुरु केली आहे. यातही अपयश आल्यास अजूनही इतरत्र जागा शोधली जाणार आहे.
मनपाकडून उड्डानपुलाखालील जागा मिळावी, यासाठी त्या विभागाकडे पत्रव्यवहार सुरु आहे, तसेच पेलिकन पार्कसमोरील जागेचा पर्याय आहे
राहुल गणोरे, अध्यक्ष, चौपाटी व्यावसायिक