Nashik Natya Spardha | नाशिकच्या रंगमचाला नाट्यविश्वात ऐतिहासिक महत्त्व

Nashik Natya Spardha | लक्ष्मण सावजी : राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला प्रेक्षकगृह हाऊसफुल्ल
Nashik Natya Spardha | नाशिकच्या रंगमचाला नाट्यविश्वात ऐतिहासिक महत्त्व
Published on: 
Updated on: 

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

नाशिकच्या रंगमंचावर कलाकृती सादर करणे ही कलाकारोंसाठी यशाची पहिली पायरी असून, या रंगमचाला नाट्यविश्वात ऐतिहासिक महत्त्व आहे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांनी केले.

Nashik Natya Spardha | नाशिकच्या रंगमचाला नाट्यविश्वात ऐतिहासिक महत्त्व
Nashik Trimbakeshwar Road | नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे रुंदीकरण वेगात; आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

स्पर्धेच्या सुरवात वीरशैव तरुण संघ प्रस्तुत ॲड. अरुण आवटे लिखित आणि सुरेश गायधनी दिग्दर्शित दोन अंकी नाटक 'अनुभव मंटप' या नाटकाने झाली. राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा प्रारंभ पहिल्याच दिवशी प्रेक्षकगृह हाऊसफुल्ल झाल्याने नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६५ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा सोमवारपासून (दि. १६) थाटात प्रारंभ झाली. नाट्य मेजवानीचे उद्घाटन भाजप ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुंबई येथील सांस्कृतिक संचालनालयाचे सहाय्यक संचालक आदेश जाधव, समन्वय्यक राजेश जाधव, सांस्कृतिक समन्वयक मीना वाघ, अखिल भारतीय नाट्य परिषद, नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, परीक्षक छत्रपती संभाजीनगर येथील कैलास टायरे, उल्का कुलकर्णी आणि सोलापूरचे शिवानंद चलवादी आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

आजचे नाटक (दि. १७)

पिवळी भिंत यांनी साकारल्या दमदार भूमिका सचिष वाडकर, संजय सोनार, आनंद निकुंभ, दुर्गेश भुसारे, मोहन आवटे, तृप्ती आवटे, सुशीला आंधोळकर, गार्गी गुळवे, ओजस्वी डोंगरे, प्रशांत घोडेस्वार, जयराम वाघ आदी कलाकारोंसह वरद खरंवडीकर, सानवी आवटे, ईरा डोंगरे, ईषा डोंगरे, अनिका खरंवडीकर आणि आमय जेवेरे या बालकलाकारांनी दमदार भूमिका सादर केली.

२३ नाटकांचे सादरीकरण

नाशिक केंद्राची प्राथमिक फेरीमध्ये एकूण २३ नाटकांची मेजवानी मिळणार असून परशुराम साईखेडेकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी सातला प्रेक्षकांना सदर नाटक पाहता येणार आहेत. आठ डिसेंबरपर्यंत स्पर्धा सुरू राहणार आहेत. सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार सदर स्पर्धा होत आहे. नाशिक केंद्राच्या प्राथमिक फेरीत नाशिकसह धुळे, इंदूर आदी नाट्यसंस्थेकडून स्पर्धेत सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक आणि समकालीन विषयावरील नाटकं सादर केली जाणार आहेत.

Nashik Natya Spardha | नाशिकच्या रंगमचाला नाट्यविश्वात ऐतिहासिक महत्त्व
Nashik Pune Railway Project: नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प पुन्हा चर्चेत; आमदार सत्यजीत तांबे आक्रमक, जनसुनावणीची मागणी!

'अनुभव मंटप' मधून दिला सामाजिक परिवर्तनाचा संदेश

एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात जगतांना देखील समाजामध्ये जातीवता, विषमता, अंधश्रद्धा, स्त्री-पुरुष भेदभाव आणि सामाजिक असमानता पूर्णपणे नष्ट झालेली नाही. अशा परिस्थितीत महात्मा बसवेश्वरांचे विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आणि मार्गदर्शक आहेत. नाटकाच्या माध्यमातून बसवेश्वरांचे जीवनकार्य, त्यांचे विचार 'अनुभव मंटपची' ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि साहित्याचा सामाजिक संदेश देण्यात आला.

नाटकासाठी संगीत अमित मुले, नेपथ्य नितीन हिंगमिरे, रंगभूषा माणिक कांडे, वेशभूषा वैशाली आवटे, प्रकाशयोजனாची जबाबदारी विनोद राठोड यांनी सांभाळली. श्री अथर्व नगरी सहकारी पतसंस्था, विरंगुला ज्येष्ठ नागरिक संघ, अभय सदावर्ते, गिरीश जुन्नरे, गौरव खरंवडीकर, ऋषिकेश जेवेरे यांनी नाटकासाठी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.