Sports News Nashik | भारतीय युवा क्रिकेट संघात नाशिकचा साहील पारख

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पदार्पण
साहिल गोकुळ पारख
येथील डावखुरा धडाकेबाज फलंदाज साहिल गोकुळ पारख याची 19 वर्षांआतील भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. Image source - X
Published on
Updated on

नाशिक : येथील डावखुरा धडाकेबाज फलंदाज साहिल गोकुळ पारख याची 19 वर्षांआतील भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. दि. २१ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये डावाची सुरुवात साहील करणार आहे. त्याच्या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पुदुचेरी आणि चेन्नई येथे दि. २१ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये एकदिवसीय चार सामने, तर दोन कसोटी सामने खेळणार आहे. साहीलने यापूर्वी 14 वर्षांतील, 16 वर्षांतील व 19 वर्षांतील महाराष्ट्र संघात आपल्या चांगल्या कामगिरीने भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्येही त्याने तडाखेबंद फलंदाजी करून महाराष्ट्रासह देशाचे लक्ष त्याच्यावर केंद्रित केले होते. साहील हा नाशिक क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असून, त्याच्या निवडीबद्दल नाशिक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष धनपाल शाह, सचिव समीर रकटे, नाशिक क्रिकेट अकॅडमीचे संचालक मकरंद ओक व प्रशिक्षक अमित पाटील, श्रीरंग कापसे यांनी अभिनंदन केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकचा एक तरी खेळाडू भारतीय संघात जावा यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन खेळाडूंवर मेहनत घेत होते. आज ते स्वप्न साकार झाल्याचा आनंद नाशिक जिल्हा असोसिएशन व साहीलच्या पालकांना झाला आहे. यातून नाशिकचे खेळाडू निश्चितच प्रेरणा घेतील.

धनपाल शहा, अध्यक्ष, नाशिक क्रिकेट असोसिएशन, नाशिक.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news