

नाशिक : सांगली येथे आयोजित ‘पुढारी’च्या एज्यु दिशा २०२५ शैक्षणिक प्रदर्शनात विविध शैक्षणिक संस्थानी सहभाग नोंदविला. यात नाशिक येथील के. के. वाघ शैक्षणिक संस्थेअंतर्गत इंजिनिरिंग, पोलिटेक्निक, फार्मसी, कृषी व कृषी संलग्न आणि वरिष्ठ महाविद्यालयाने सहभाग घेतला.
‘पुढारी’च्या एज्यु दिशा २०२५ शैक्षणिक प्रदर्शनामध्ये ‘संजय घोडवत विद्यापीठ, कोल्हापूर’ या संस्थेचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी के. के. वाघ संस्थेच्या स्टॉलला भेट दिली. या महाविद्याल्यांच्या शैक्षणिक स्टॉलला विविध ठिकाणाहून आलेल्या विद्यार्थी व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला लाभला.
के. के. वाघ शैक्षणिक संस्थेने कोल्हापूर व सातारा ‘पुढारी’ आयोजित शैक्षणिक प्रदर्शनामध्ये देखील सहभाग नोंदविला होता. याठिकाणी देखील विद्यार्थांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष समीर बाळासाहेब वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी, सरस्वती नगर संकूलाचे समन्व्यक डॉ. वी. एम. शेवलिकर, तसेच इंजिनिअरींग, पोलिटेक्निक, फार्मसी, कृषी व कृषी संलग्न व वरिष्ठ महाविद्यालयांचे सर्व प्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले.