Special Trains for Diwali, Chhat Puja : दिवाळी, छठ पूजेसाठी विशेष रेल्वेगाड्या; पहा वेळापत्रक

मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणांवरून विशेष गाड्या
Central Railway special trains
Central Railway special trainsPudhari Photo
Published on
Updated on

Central Railway special trains during Diwali and Chhath festival season

देवळाली कॅम्प (नाशिक) : येत्या पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव हंगामात मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणांवरून विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष गाड्या याप्रमाणे...

  • मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–गोरखपूर– मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (१३२ फेऱ्या)

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – गोरखपूर विशेष सेवा २६ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ६६ फेऱ्या

  • गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) दरम्यान २८ सप्टेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत ६६ फेऱ्या होणार आहेत. या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ हे थांबे राहणार आहेत.

  • पुणे – गोरखपूर – पुणेदरम्यान २७ सप्टेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत १३० फेऱ्या होणार आहेत.

  • गोरखपूर – पुणे विशेष सेवा २८ सप्टेंबर ते १ डिसेंबरदरम्यान ६५ फेऱ्या राहणार आहेत. या गाड्यांना दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा हे थांबे राहणार आहेत.

  • नागपूर – पुणे – नागपूर दरम्यान २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबरदरम्यान २० फेऱ्या होणार आहेत.

  • लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) – दानापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस दैनिक विशेष ट्रेनच्या १३४ फेऱ्या होणार आहेेत. या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी हे प्रमुख थांबे आहेत.

  • मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर – लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान साप्ताहिक २० फेऱ्या राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news