Somvati Amavasya 2024 | मार्कंडेश्वर पर्वतावर बंदी असतानाही भाविकांची गर्दी

दरड कोसळण्याची शक्यता; गेल्यावर्षी भाविक झाले होते जखमी
Somvati Amavasya -Markandeshwar Hills
मार्कंडेश्वर पर्वतावर बंदी असतानाही भाविकांची गर्दी pudhari photo
Published on
Updated on

कळवण : ऋषीपंचमी निमित्ताने श्री मार्कंडेश्वर पर्वतावर श्री मार्कंडेश्वर ऋषींच्या दर्शनासाठी व भरणाऱ्या यात्रेसाठी लाखोंचा जनसागर पर्वतावर येतो. गेल्यावर्षी अमावस्येच्या दिवशी मार्कंडेय पर्वतावर जाणाऱ्या भाविकांचा पायघसरुन ५ ते ६ भाविक जखमी झाले होते. त्यामुळे ऋषी पंचमी निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर दर्शनाला जाण्यासाठी व यात्रा भरविण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांनी यावर्षी बंदी घातली आहे. तरी देखील भाविकांनी पर्वतावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

सोमवती अमावस्या निमित्त मार्कड ऋषीपर्वतावर मंदिरात दर्शनासाठी नाशिक जिल्हा तसेच बाहेर राज्यातून तसेच पंचक्रोषीतून हजारोच्या संख्येने भाविक मार्कडऋषी पर्वतावर येत असतात. मागील वर्षी सोमवती अमावस्यावेळी सुमारे १ लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला होता परंतु इतक्या मोठया प्रमाणात झालेल्या गर्दीतून वणी ता. दिंडोरी भागातून काही भाविक अवघड मार्गाने जात असतांना पाय घसरुन खोल दरीत पडून जखमी झाले होते. मुळाणे बारीतही जात असतांना ४ ते ५ भाविक पाय घसरुन जखमी झाले होते. तसेच मार्कडऋषी पर्वतावर जातांना सपाटी भागाजवळ पर्वतावर जाण्यासाठी अरुंद असा लोखंडी जिना दुर्लक्षीत जीर्ण स्वरुपाचा व तुटलेल्या स्थितीचा आहे. सध्या पावसाचे दिवस असून पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्वतावर जाणे व उतरणे जिवीतास धोकादायक असून चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे प्रशासनाने बंदी घातली आहे, तरी देखील भाविकांनी गर्दी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news