SMBT News : दिलासादायक ! एसएमबीटी फार्मसीच्या 72 विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड
नाशिक : एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी व एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा फार्मसीच्या तब्बल 72 विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीतून बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली. अडीच लाख ते 10 लाख रुपये प्रतिवर्ष अशा वार्षिक पॅकेजवर त्यांना संधी मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ. योगेश उशीर यांनी दिली.
एसएमबीटी शैक्षणिक संकुल येथे एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी व एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा फार्मसी असे दोन औषधनिर्माण महाविद्यालये आहेत. याठिकाणी तब्बल 15 पेक्षा अधिक कर्मचारी पीएच.डी.धारक आहेत. त्यामुळे गुणवत्तेतदेखील वाढ आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ठसा उमटविण्यात विद्यार्थ्यांना यश आल्याचे डॉ. उशीर म्हणाले.
फार्मसीमध्ये गेल्या पाच वर्षांत 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्याआधीच नोकर्या मिळाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत तब्बल 4 वेळा विविध कंपन्यांनी याठिकाणी भेटी देत विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे, तर औद्योगिक ज्ञान, संवाद कौशल्य आणि जागतिक स्तरावर प्रतिनिधित्वामध्ये ठसा उमटवला आहे. वेगवेगळ्या विद्यापीठांसोबतच्या सहयोगामुळे हे शक्य झाले.
डॉ. योगेश उशीर, प्राचार्य, एसएमबीटी फार्मसी महाविद्यालय

