Health Tracker Smartwatch | वेळ पाहण्यासोबत आरोग्याची काळजी! तरुणाईचा 'स्मार्टवॉच' वापराकडे वाढता कल

Health Tracker Smartwatch | गेल्या काही वर्षांत स्मार्टवॉचच्या वापरात मोठी वाढ झाली आहे. तरुणांसह विविध वयोगटांतील नागरिकांकडून त्याला पसंती मिळत आहे.
Smartwatch Works |
Smartwatch Works | स्मार्टवॉच कसे काम करते?
Published on
Updated on

गेल्या काही वर्षांत स्मार्टवॉचच्या वापरात मोठी वाढ झाली आहे. तरुणांसह विविध वयोगटांतील नागरिकांकडून त्याला पसंती मिळत आहे. वेळ पाहण्यापुरते मर्यादित असलेले पारंपरिक घड्याळ आता आरोग्य, फिटनेस आणि दैनंदिन कामांचे व्यवस्थापन करणारे स्मार्ट उपकरण बनले आहे.

Smartwatch Works |
Pune Nashik Highway Accident: पुणे-नाशिक महामार्गावरील पानमळा वळण बनले जीवघेणे; गतिरोधक दबल्याने अपघातांचा धोका

स्मार्टवॉचच्या माध्यमातून हृदयाचे ठोके, रक्तातील ऑक्सिजनची पातळी, झोपेचा कालावधी, चाललेली पावले आणि व्यायामाची माहिती मिळते. कॉल, संदेश आणि मोबाईलवरील विविध सूचना थेट मनगटावर पाहता येत असल्याने दैनंदिन जीवनात त्याचा वापर वाढला आहे.

विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार आणि फिटनेसची आवड असलेल्या नागरिकांमध्ये स्मार्टवॉचचा ट्रेंड अधिक दिसून येत आहे. पूर्वी स्मार्टवॉच हे महागडे उपकरण मानले जात होते. मात्र, सध्या विविध कंपन्यांकडून वेगवेगळ्या किंमत श्रेणीतील स्मार्टवॉच उपलब्ध झाल्याने ग्राहकांसमोर अनेक पर्याय निर्माण झाले आहेत.

बेसिक स्मार्टवॉचची किंमत साधारण १ हजार ते ३ हजार रुपये, ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच ३ हजार ते ७ हजार तर मध्यम श्रेणीतील स्मार्टवॉच ७ हजार ते २० हजारापर्यंत उपलब्ध आहेत. ॲपल, सॅमसंग आणि गारमिन यांसारख्या कंपन्यांच्या प्रीमियम स्मार्टवॉचची किंमत सुमारे २० हजारांपासून दीड लाखापर्यंत आहे.


बाजारात बेसिक फिटनेस स्मार्टवॉच, ब्लूटूथ कॉलिंग, जीपीएस, प्रीमियम व मुलांसाठी विशेष स्मार्टवॉच असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. सुविधांनुसार आणि वापराच्या गरजेनुसार ग्राहकांकडून त्यांची निवड केली जात आहे.

Smartwatch Works |
Pune Nashik Highway Accident: पुणे-नाशिक महामार्गावरील पानमळा वळण बनले जीवघेणे; गतिरोधक दबल्याने अपघातांचा धोका

मात्र, स्मार्टवॉचमध्ये मिळणारी आरोग्यविषयक माहिती ही प्राथमिक स्वरूपाची असल्याने कोणत्याही आजाराचे निदान किंवा उपचारासाठी केवळ स्मार्टवॉचवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्मार्टवॉच उपयुक्त साधन ठरत असले तरी त्याचा वापर योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे.

स्मार्टवॉचमुळे मोबाईल वारंवार हातात घेण्याची गरज कमी होते. पावले, व्यायाम आणि झोपेची माहिती मिळत असल्याने दैनंदिन फिटनेसकडे लक्ष देता येते.

अश्विनी राऊत, विद्यार्थिनी

कॉल आणि संदेशांच्या सूचना मनगटावरच मिळत असल्याने कामाच्या वेळेत मोबाईल तपासण्याची गरज कमी होते. त्यामुळे दैनंदिन कामात स्मार्टवॉच सोयीचे वाटते.

विक्रांत गोसावी, विद्यार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news