सिन्नर : तालुक्यातील सरपंच वस्ती, खंडागळी येथे रविवारी (दि. ७) सायंकाळी सहा वर्षीय शिव संपत बोस या बालकावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर सिन्नरचे वनपाल, वनरक्षक आणि संबंधित कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरात पिंजरा लावण्यात आला असून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
दरम्यान, वन विभागाच्या मदतीने जखमी बालकाला तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.