Kumbh Mela Nashik | कुंभमेळ्यात सिन्नरकडून नाशिकला पाच दिवस 'नो एंट्री'!

Kumbh Mela Nashik | वाहतूक नियोजनासाठी 'सिमा' कार्यालयात बैठक
Nashik Kumbh Mela 2026
Nashik Kumbh Mela 2026
Published on
Updated on

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात होणारी मोठ्या प्रमाणावरील वाहतूक आणि त्याचा सिन्नर एमआयडीसीतील उद्योगांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन वाहतूक नियोजनाबाबत सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सिमा) च्या कार्यालयात वाहतूक विभागाच्या वतीने बैठक घेण्यात आली.

Nashik Kumbh Mela 2026
Nashik Farmer Loan | शेतकरी कर्जमाफीनंतरही नाशिक जिल्हा बँकेची कोंडी कायम; अपेक्षित निधी न मिळाल्याने पेच!

कुंभमेळा पर्वणी काळात सलग पाच दिवस नाशिकच्या दिशेने कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यावर उपायांची मागणी करण्यात आली.
या बैठकीस वाहतूक विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक कदम, सहायक पोलिस निरीक्षक गरुड आदी उपस्थित होते. 'सिमा'चे अध्यक्ष सुकुमार नायर, सचिव बबन वाजे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.

कुंभमेळ्याच्या कालावधीत सुमारे ५० दिवस नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. विशेषतः पर्वणीच्या काळात मोठे वाहतूक निर्बंध लागू राहणार आहेत. पर्वणीच्या काळात सलग पाच दिवस नाशिकच्या दिशेने कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही.

पर्वणीच्या दिवशी सिन्नरपासून पुढे नाशिकच्या दिशेने १०० टक्के वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. कुंभमेळा सुरळीत पार पाडण्यासाठी उद्योग क्षेत्राच्या वतीने पोलिस व प्रशासनाला आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्ष सुकुमार नायर व सचिव बबन वाजे यांनी दिले.

कच्चा व पक्का माल आधीच हलविण्याचे आवाहन

पर्वणीच्या काळात पाच दिवस वाहतूक बंद राहणार असल्याने कंपन्यांनी उत्पादन व मालवाहतुकीचे नियोजन आधीपासून करण्याचे आवाहन करण्यात आले. पर्वणीच्या किमान पाच दिवस अगोदर आवश्यक कच्चा माल कंपनीत मागवून घेणे तसेच तयार पक्का माल बाहेर पाठविण्याचे नियोजन करावे, असे बैठकीत सांगण्यात आले.

Nashik Kumbh Mela 2026
Nashik FDA Raid | FDA चा मोठा दणका! नाशिक जिल्ह्यात नियम मोडणाऱ्या खाद्य व्यावसायिकांवर कारवाईची कुऱ्हाड

५० दिवस ५०० वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त

कुंभमेळ्याच्या कालावधीत वाहतूक नियंत्रणासाठी सुमारे ५०० वाहतूक पोलिस कर्मचारी ५० दिवस कार्यरत राहणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या पोलिसांच्या सिन्नर येथील निवास, भोजन आणि अन्य सुविधांबाबत चर्चा झाली.

उद्योजकांकडून विशेष पासची मागणी

वाहतूक बंदीचा उद्योगांच्या उत्पादन प्रक्रियेवर परिणाम होऊ नये, यासाठी पर्वणीच्या दोन दिवस अगोदर आणि पर्वणीनंतर दोन दिवस सिन्नर एमआयडीसीतील उद्योजकांच्या कार तसेच कंपनीच्या बसला विशेष पास देण्यात यावेत, अशी मागणी 'सिमा'ने केली.

उद्योजकांनी वाहतूक विभागाचा गुगल फॉर्म भरावा

उद्योजकांच्या वाहतूकविषयक गरजा, कंपन्यांची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी गुगल फॉर्म तयार केला असून, या फॉर्ममध्ये कंपनीचे नाव, प्रतिनिधीची माहिती, दररोजची अवजड वाहने, नाशिक शहरातून जाणारी वाहने सह विविध माहिती मागवण्यात आली आहे. उद्योजकांनी हा फॉर्म भरून सिमा कार्यालयाकडे जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गुगल फॉर्म भरण्यासाठी

logo
Pudhari News
pudhari.news