Malegaon Sinnar Leopard | सिन्नरच्या माळेगावात बिबट्याची दहशत! एचपी गॅस परिसरात वन विभागाकडून ३ पिंजरे दाखल.

Malegaon Sinnar Leopard | थर्मल ड्रोनसह दिवस-रात्र पाहणी : वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृतीवर भर
Malegaon Sinnar Leopard
Malegaon Sinnar Leopard Pudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
माळेगाव (ता. सिन्नर) येथील एचपी गॅस परिसरात वन्य जिवाच्या संभाव्य वावराच्या पार्श्वभूमीवर वन विभागातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सातत्याने पाहणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात तीन पिंजरे बसविले असून, सामान्य ड्रोन तसेच थर्मल ड्रोनच्या साहाय्याने दिवसा व रात्री परिसराची पाहणी करण्यात येत आहे.

Malegaon Sinnar Leopard
Sindhudurg|कार चालकावर हल्ला करणारे तिघेजण नाशिक येथून जेरबंद! सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांचा काढला माग

सिन्नर वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी तसेच सुरक्षा प्रभारी वाघुळे यांनी सोमवारी (दि. १४) परिसराची पाहणी करून दोन पिंजरे बसविले. या वेळी वन्य जीव-मानव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती कार्यक्रम घेतला. त्यानंतर मंगळवारी (दि. १५) सिन्नर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बडगुजर यांच्यासोबत संपूर्ण परिसराची पुन्हा पाहणी केली.

मागणीनुसार आणखी एक पिंजरा बसविला, तर बुधवारी (दि. १६) सहाय्यक वनसंरक्षक यांच्या उपस्थितीत दिवसा तसेच रात्री संपूर्ण परिसराची तपासणी केली. यासाठी सामान्य ड्रोनसह थर्मल ड्रोनचा वापर केला.

Malegaon Sinnar Leopard
Sindhudurg|कार चालकावर हल्ला करणारे तिघेजण नाशिक येथून जेरबंद! सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांचा काढला माग

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसराची प्रत्यक्ष पाहणीही केली. तसेच वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमच्या परिसराची विशेष तपासणी करून तिथे बछड्यांची उपस्थिती आहे का, याची पडताळणी केली. गुरुवारी (दि. १७) व शुक्रवारी (दि. १८) परिसरातील कुंपणाचे काम केले. या कामासाठी वन विभागाचे कर्मचारी तसेच एचपी कंपनीचे कर्मचारी सहभागी झाले होते.

दरम्यान, वन्य जीव-मानव संघर्षाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी नाशिक टीटीसी केंद्रामार्फत २१ सप्टेंबर रोजी जनजागृती कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, वन्यजीव आढळल्यास त्याच्या जवळ जाऊ नये किंवा त्यास त्रास देऊ नये आणि तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news