

सिन्नर : संदीप भोर
शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सिन्नर तालुक्यातील १४ गावांचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीत समावेश असून, त्याचा लाभ हजारो शेतकऱ्यांना मिळेल. एकूण १५१ मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पांमधून शेतकऱ्यांना स्वस्त, सातत्यपूर्ण आणि दिवसा बीज मिळणार असून, त्यांना रात्रीच्या वेळी शेती करण्याच्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे,
सध्या शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा बीज उपलब्ध होत नाही. अशातच घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अपारंपरिक ऊर्जा खोतांद्वारे वीजनिर्मिती करून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचा शासनाचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.
या सौर प्रकल्पांसाठी प्रामुख्याने वर्षानुवर्षे वापरात नसलेल्या गायरान जमिनींचा उपयोग करण्यात येत आहे. राज्याचे क्रीडामंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती यांचे या प्रकल्प उभारणीत महत्त्वाचे सहकार्य लाभले आहे. काही प्रकल्पांची कामे पूर्ण होऊन ऊर्जानिर्मिती सुरू झाली आहे, तर काही प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. निर्माण होणारी बीज जवळच्या ३३ केव्ही वीजउपकेंद्रास जोडून ती लाभार्थी गावांच्या फिडरद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहे.
तीन रुपये प्रति युनिटने पुढील २५ वर्षे महावितरणला वीज
या सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी आवादा एनर्जी प्रा. लि. तसेच टोरंटो पॉवर लिमिटेड तर्फे बी. यू. भंडारी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. एका १० मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा खर्च येतो. यामधून निर्माण होणारी वीज महावितरण कंपनीला ३ रुपये प्रति युनिट दराने पुढील २५ वर्षे विकली जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
घोरवड, मनेगाव येथील प्रकल्प प्रलंबित
तालुक्यातील घोरवड (५ मेगावॉट) व मनेगाव (८ मेगावॉट) येथेदेखील सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र घोरवडमध्ये ४० एकर आवश्यक जागा उपलब्ध न झाल्यामुळे, तर मनेगावमध्ये ५६ एकर जागेच्या प्रश्नावरून काही ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे हे प्रकल्प रखडले आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सिन्नर तालुक्यात उभारले जात असलेले हे प्रकल्प ग्रामीण भागासाठी ऊर्जा स्वावलंबनाचे सकारात्मक पाऊल ठरणार आहेत. दिवसा वीजपुरवठा सुरू झाल्यास शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढेल, त्यांचा वेळ आणि श्रम वाचतील आणि सामाजिक-आर्थिक बदल अनुभवायला मिळेल.
अॅड. माणिकराव कोकाटे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री
विजेचा तुटवडा असल्याने सध्या शेती ग्राहकांना दिवसा बीज उपलब्ध होत नाही. या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा बीज मिळून सोय होणार आहे. हे प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.
प्रकाशभाऊ वाजे, ज्येष्ठ नेते
काही प्रकल्पांची कामे पूर्ण झाली 66 असन बहुतांश सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. येत्या तीन महिन्यांन ही कामे पूर्ण करून शेती ग्राहकांन दिवसा बीज देण्याचे उद्दिष्ट आहे.
व्ही. पी. हारक, उपकार्यकारी अभियंता, सिन्नर उपविभाग-२