

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ महाकुंभ हा भारतीय संस्कृतीचा आविष्कार आहे. या कुंभमेळ्यासाठी ३४ हजार कोटींचा खर्च कशासाठी, असा सवाल करणारे बालबुद्धीचे असल्याची खरमरीत टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला, २० टक्के सिंहस्थ निधी कायमस्वरूपी सुविधांवर खर्च होत असून, या सुविधा केवळ कुंभमेळ्यापुस्त्या मर्यादित नाहीत तर, पुढील ५० वर्षे त्यांचा उपयोग होणार आहे. त्यामुळे नाशिक व त्र्यंबकेश्वरला आधुनिक स्वरूप मिळणार आहे, तीर्थक्षेत्र म्हणून असलेल्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे ठक्कर होम येथे आयोजित तीनदिवसीय 'कुंभ मक्ती संगम' या आध्यात्मिक कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, कुंभमेळा हा साधू-महंतांचा आहे. आम्ही केवळ त्याची व्यवस्था करण्यासाठी आहोत. विविध पंथ, विचारधारा, जाती-धर्माचे लोक कोणताही न करता एकत्र येतात, हेच कुंभमेळ्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्व आहे. विविध परंपरांमधून होणारे मंथन आणि चिंतनातून मिळणारे 'विचारांचे अमृत' हीच कुंभाची खरी ताकद आहे.
साधुसंतांच्या आशीर्वादाने आगामी सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्न पार पडण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. 'कुंभ भक्ती संगमा'तून या महापर्वाची सुरुवात होत असून, येत्या ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुंभमेळ्याचे ध्वजारोहण करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू केल्याने नाशिककर आणि त्र्यंबकेश्वरकरांना सध्या त्रास सहन करावा लागत आहे. मंत्री, आमदार आणि खासदारांनाही टीकेला सामोरे जावे लागत आहे. कोणतेही मोठे परिवर्तन करताना अशा टीकेला सामोरे जावेच लागते. मात्र, कामे पूर्ण झाल्यानंतर हेच लोक हार घालतील. त्यामुळे चांगले काम करताना घाबरू नका; मात्र ते पारदर्शक आणि जनसेवेचे असले पाहिजे, असा संदेश फडणवीस यांनी दिला, कोणत्याही परिस्थितीत कामे वेळेत पूर्ण केली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
नाशिकचा कुंभही विक्रमी ठरणार!
नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसराची सध्याची क्षमता सुमारे ४० लाख लोकांचा भार सहन करण्याची आहे. मात्र, आगामी कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक येण्याची शक्यता आहे. प्रयागराज कुंभमेळ्यात अपेक्षेपेक्षा पाचपट भाविक आल्याने आस्थेचा जागतिक विक्रम झाला. तसाच विक्रम नाशिकच्या कुंभमेळ्यातही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, पणन व राजशिष्टाचारमंत्री भेदभावस्थ जयकुमार रावल, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार राजाभाऊ वाजे, आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे, अॅड. राहुल ढिकले, आ. गोकुळ गिते, किशोर दराडे, डॉ. राहुल आहेर, हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, प्रा. सदानंद मोरे, कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, एनएमआरडीए आयुक्त जलज शर्मा आदी उपस्थित होते.