Vedha Singhastha / वेध सिंहस्थाचे
वेध सिंहस्थाचे : Simhastha Kumbh Mela NashikPudhari News Network

Simhastha Nashik : 'एनएमआरडीए' क्षेत्रात आता किमान 15 मीटरचे रस्ते

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Published on

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा तसेच प्रस्तावित ड्रायपोर्ट, आयटी पार्क, वाढते औद्योगिकरण, लॉजिस्टिक पार्क, ओझर विमानतळाचा विस्तार लक्षात घेता नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एनएमआरडीए)ने नाशिक शहराला जोडणाऱ्या पोच रस्त्यांची किमान रुंदी 15 मीटर अनिवार्य केली आहे. भौगोलिक अडथळे असलेल्या रस्त्यांची रुंदी 12 मीटर केली जाणार आहे.

शहराचा विस्तार मागील काही वर्षांत झपाट्याने वाढत आहे. महापालिका हद्दीलगतच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या हद्दीतील भागाच्या विकासासाठी आराखडा तयार केला जात आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या आराखड्यातील रस्त्यांची रुंदी निश्चित करण्यात आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराची गरज लक्षात घेता, बाह्यरिंग रोडलाही मान्यता देऱ्यात आली आहे.

Vedha Singhastha / वेध सिंहस्थाचे
CM Devendra Fadnavis says About Simhastha : जग स्तिमित होईल असा सिंहस्थ कुंभमेळा होणार

समृद्धी व सुरत - चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग तसेच वाढवण बंदर ते इगतपुरी येथे समृद्धी महामार्गाला भरविहीर येथे जोडणारा ११८ किलोमीटर महामार्ग तयार केला जाणार आहे. आयटी पार्क, ड्रायपोर्ट, लॉजिस्टिक पार्कमुळे वाहतूक वाढणार आहे. त्यामुळे एनएमआरडीमार्फत रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे. एनएमआरडीएने यापूर्वी रस्ता रुंदीकरणात बदल केले, त्यात ग्रामीण मार्ग १५ मीटरवरून १८ मीटर, इतर जिल्हा मार्ग १८ मीटरवरून २४ मीटर, प्रमुख जिल्हा मार्ग २४ मीटरवरून ३० मीटर करण्यात आले आहे. आता ले - आउट करताना प्रमुख रस्त्यांना जोडणारे रस्ते 15 मीटर बंधनकारक करण्यात आले आहेत.

Nashik Latest News

असा आहे आदेश...

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. माणिकराव गुरसळ यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आले आहेत. प्राधिकरणाकडे विकास परवानगीसाठी प्राप्त होणाऱ्या बहुतांश प्रस्तावाखालील जागांस, नजीकच्या सार्वजनिक रस्त्यालगत असलेल्या जागांतून संबंधित जागामालकांच्या संमतीने पोच रस्ता उपलब्ध करून घेण्यात येतो. प्रचलित एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०२० मधील तरतुदींनुसार आवश्यक उपलब्ध पोच रस्त्याच्या रुंदीनुसार प्रस्तावाधिन जागेत विकास परवानगी दिली जाते. त्या अनुषंगाने भविष्यातील मोठ्या रुंदीच्या रस्त्यांची आवश्यकता विचारात घेता, पोच रस्त्यांची किमान रुंदी 15 मीटर अनिवार्य करण्यात आली आहे. अपरिहार्य भौतिक किंवा भौगोलिक अडथळे जसे की, नदी, धरणे, डोंगर आदींबाबत महानगर आयुक्तांच्या पूर्वमान्यतेने किमान १२ मीटर रुंदीचा पोच रस्ता संमतीने घेण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news