Simhastha Kumbh Mela Nashik: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज सिंहस्थ बैठक

आराखडा मंजुरीची शक्यता; बैठकीपासून आमदार दूर
Vedha Singhastha / वेध सिंहस्थाचे
वेध सिंहस्थाचे : Simhastha Kumbh Mela NashikPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. ४) दुपारी 2.30 वाजता सह्याद्री अतिथिगृहात बैठक होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीस शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना पाचारण करण्यात आले असले, तरी आमदारांना मात्र दूर ठेवण्यात आल्याने नाराजीचा सूर उमटला आहे.

येत्या २०२६- २७ मध्ये नाशिक- त्र्यंबकेश्‍वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्यासाठी महापालिकेने १५ हजार कोटींचा, तर अन्य विभागांनी नऊ हजार कोटींचा असा एकूण २४ हजार कोटींचा विकास आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात एक हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य केल्यानंतर जुलैअखेरीस सिंहस्थ प्राधिकरण समितीने ५,१४० कोटी रुपयांच्या अंदाजित रकमेपैकी महापालिकेच्या ३,२७७.५८ कोटींच्या कामांना मंजुरी दिली. त्यात एकूण निधीपैकी १,००४.१२ कोटी रुपये डिसेंबर २०२५ खर्च करण्याच्या सूचना आहेत.

Vedha Singhastha / वेध सिंहस्थाचे
Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कामांचे होणार चित्रीकरण

९३० कोटी रुपयांची कामांच्या निविदा काढण्यात आल्या, त्यात क्लब टेंडरिंग झाल्याने स्थानिकांना डावलल्याचा तसेच निविदेआधी एजन्सी नियुक्ती होत असल्याचा आरोप आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम २५ वर्षांसाठी दिलेली कंपनी गुजरातमधील असल्याने विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे. सिंहस्थाची कामे वादात सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीसाठी नाशिकमधील आमदारांना मात्र निमंत्रण देण्यात आलेले नाही. आमदारांकडून केली जाणारी ठेकेदारांची पाठराखण यामागील एक कारण असल्याची चर्चा आहे.

Nashik Latest News

सिंहस्थासाठी भरीव निधीची अपेक्षा

कुंभमेळ्यासाठी आता जेमतेम पावणेदोन वर्षांचा कालावधी असल्याने सिंहस्थकामांना वेग देण्याची गरज आहे. त्यासाठी सिंहस्थ निधी शासनाकडून मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यातच नाशिकच्या आमदारांनी स्थानिक ठेकेदारांना सिंहस्थकामे मिळण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यात सिंहस्थासाठी भरीव निधी देण्याची मागणीही केली होती. आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news