Simhastha Kumbh Mela | पुरातत्त्व संवर्धन कामांना गती द्या, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी तयारी

Simhastha Kumbh Mela 2027 Preparations - सांस्कृतिक कार्य विभाग सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी घेतला सिंहस्थकामांचा आढावा
Simhastha Kumbh Mela Nashik
Simhastha Kumbh Mela NashikPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागामार्फत सुरू असलेल्या कामांना गतिमान करण्याच्या सूचना राज्याचे मराठी भाषा विभाग तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिल्या.

Simhastha Kumbh Mela Nashik
Scheduled Castes Sub Classification Opposition|अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला विरोध

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागामार्फत सुरू असेलेल्या संवर्धन, जतन व विकासकामांचा आढावा डॉ. कुलकर्णी यांनी सोमवारी (दि. ३) नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या मुख्यालयात घेतला. यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, एएसआयचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Ring Road Project|नाशिक परिक्रमा मार्गमुळे बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गंभीर दखल, १० दिवसांत उच्चस्तरीय बैठक

बैठकीत संगम तीर्थ व जुने कुशावर्त, नारोशंकर मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, गौतमेश्वर मंदिर, मुकुंदेश्वर मंदिर व तलाव, प्रयाग तीर्थ, बिल्व तलाव व मंदिर, चोखोबा मंदिर, सुंदरनारायण मंदिर व घाट, इंद्रकुंड, बालाजी कोट भिंत, गौतम तलाव, अजगरेश्वर समाधी, टाळकुटेश्वर व मोदकेश्वर मंदिरे तसेच त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड व परिसराच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कामांच्या प्रगतीची माहिती घेतानाच सर्व प्रकल्प निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित सांस्कृतिक उपक्रमांचाही आढावा घेतला. तसेच दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या समन्वयातून महाराष्ट्रातील हस्तकला, लोककला, आदिवासी कला व सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या प्रस्तावित कलाग्राम

संकल्पनेचे नियोजन व क्युरेशनबाबत चर्चा झाली. सिंहस्थ काळात नाशिक येथील गोदावरी मंडप आणि त्र्यंबकेश्वर येथील अहिल्या मंडप येथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या क्युरेशन व नियोजनाबाबतही यावेळी चर्चा झाली.

युनेस्को वारसा स्थळासाठी चर्चा

दावोस २०२७ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रचार - प्रसार, 'हर घर कुंभ' अभियान, 'महाराष्ट्र स्पिरिच्युअल थॉट लीडरशिप' उपक्रम, आध्यात्मिक व ज्ञान परिषदा तसेच जागतिक दर्जाचे 'सिंहस्थ इंटरप्रिटेशन अँड एक्स्पिरियन्स सेंटर' उभारण्यासंदर्भात चर्चा झाली. याशिवाय नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील वारसा स्थळांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याबाबत चर्चा झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news