Deola Ganpati Mandir | देवळा येथे श्री चांदीचा गणपती मंदिराचे भूमिपूजन; ३९ लाखांची चांदी दान

Deola Ganpati Mandir | बाजार समितीचे माजी सभापती केदा आहेर यांची चांदीच्या गणपती मंदिराची संकल्पना
Shri Chandicha Ganpati Temple Deola
देवळा येथे चांदीच्या गणपती मंदिराचे भूमिपूजन प्रसंगी उपस्थित केदा आहेर ,भारत कोठावदे, डॉ हितेंद्र आहेर, योगेश आहेर,भाऊसाहेब पगार आदी Pudhari
Published on
Updated on

Shri Chandicha Ganpati Temple Deola

देवळा : गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर देवळा येथे श्री चांदीचा गणपती मंदिराचे भूमिपूजन बाजार समितीचे माजी सभापती केदा आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. या गणपती मंदिरासाठी जवळपास ३९ लाख रुपयांची चांदी देणगी स्वरूपात जमा झाली आहे.

देवळा शहरात चांदीच्या गणपती मंदिराची संकल्पना बाजार समितीचे माजी सभापती केदा आहेर यांची होती. त्यांच्या प्रतिसादला देवळा शहर व तालुक्यातील गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात साद दिली. आजपर्यंत जवळपास 53 देणगीदारांकडून 13 किलो 394 ग्रॅम चांदी जमा झाली आहे. त्याच प्रमाणे रोख स्वरूपात देखील देणगी मिळत आल्याचे आयोजकांनी सांगितले .

Shri Chandicha Ganpati Temple Deola
Nashik Deola News : देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी धनश्री केदा आहेर

या कार्यक्रमास प्राचार्य डॉ हितेंद्र आहेर, बाजार समिती माजी सभापती योगेश आहेर, नगरसेवक मनोज आहेर, जितेंद्र आहेर, संचालक भाऊसाहेब पगार, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत आहेर, संतोष शिंदे, भारत कोठावदे, राजेंद्र वडनेरे, भगवान खरोटे, देमकोचे व्हा. चेअरमन डॉ. प्रशांत निकम, जिभाऊ शिंदे, विजय शिंपी, राजेंद्र अहिरराव, योगेश वाघमारे, कौतिक पवार, सुनील आहेर, काकाजी शिंदे आदीसह देणगीदार, गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पौरोहित्य राहुल वाघमारे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news