Sickle cell disease | सिकलसेल नियंत्रणात नाशिक राज्यात द्वितीय

Nashik । जिल्ह्यात 50 रुग्ण : सुमारे तीन लाख नागरिकांची तपासणी
National Sickle Cell Anaemia Elimination Program
National Sickle Cell Anaemia Elimination ProgramPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : गौरव अहिरे

राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया एलिमिनेशन प्रोग्राम रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिकलसेल आजारावर नियंत्रण मिळवण्यात नाशिक जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. (National Sickle Cell Anaemia Elimination Program)

Summary

जास्तीत जास्त संशयितांची तपासणी करणे, योग्य उपचार आणि सिकलसेल वाहकांचे समुपदेशन करणे या उपाययोजनांच्या आधारे सिकलसेलवर नियंत्रण मिळवले जात आहे. जिल्ह्यात एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दोन लाख ९६ हजार ७८८ नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यात ५० बाधित आढळून आले आहेत. (National Sickle Cell Anaemia Elimination Mission)

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिकलसेल आजाराविषयी जनजागृती व तपासणी मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यातील सर्व ११२ प्राथमिक आरोग्य केंद्र, ५९२ आरोग्य उपकेंद्रामार्फत सिकलसेल तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत गत आर्थिक वर्षात दोन लाख ३० हजार नागरिकांची स्क्रिनिंग करण्याचे ध्येय होते. मात्र, आरोग्य विभागाने दोन लाख ९६ हजार ७८८ नागरिकांची स्क्रिनिंग केली. त्यात ३०९ सिकलसेल वाहक आढळून आले तर ५० सिकलसेलग्रस्त रुग्ण आढळले. या कामगिरीमुळे राज्यात नाशिक जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आला आहे.

काय आहे सिकलसेल?

सिकलसेल आजार हा अनुवंशिक असून, यामध्ये गोल आकाराच्या लाल रक्तपेशी आकार बदलून कोयत्याच्या आकाराच्या होतात.‍ सिकलसेल असलेल्या रक्तपेशी रक्तवाहिन्यांमधून सहज वाहून जाऊ शकत नाहीत. त्या घट्ट आणि चिकट होतात. त्यांचा पुंजका होतो व रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा ‍निर्माण होतो. त्यामुळे अवयवांना पुरेसा ऑक्सिजन ‍न मिळाल्याने अवयव निकामी होतात. सांधे दुखतात व संसर्ग होतो.‍ सिकलसेल आजार आदिवासी नागरिकांमध्ये सर्वाधिक आढळतो. या आजारावर उपचार नाहीत. आई-वडील दोघे सिकलसेल रुग्ण ‍किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक/ रुग्ण व्यक्ती शोधने व त्यांनी आपापसात ‍विवाह टाळावा यासाठी समुपदेशन करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

सिकलसेलचे प्रकार असे...

  • सिकलसेल गुण/वाहक : ज्या व्यक्तीचे ‍सिकल हिमोग्लोबिन ४० टक्के पेक्षा कमी असते ती व्यक्ती सिकलसेल वाहक असतात. या व्यक्तींना सिकलसेल आजाराचा त्रास होत नाही. मात्र, त्यांच्यामार्फत पुढील पिढीला हा आजार होऊ शकतो.

  • सिकलसेल रोग/ पीडित : ज्या व्यक्तीचे ‍सिकल हिमोग्लोबिन ४० टक्के पेक्षा जास्त असते ती व्यक्ती सिकलसेल बाधित असतात. या व्यक्तीना जिवाणू संसर्ग, सांधेदुखी आणि महत्त्वपूर्ण अवयव निकामी होण्याचा धोका असतो

विद्राव्यता चाचणीद्वारे जिल्हा, उपजिल्हा, महिला, ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये सिकलसेल तपासणी सुविधा उपलब्ध करणे. एचपीएलसी चाचणीद्वारे सिकलसेल वाहकाची चाचणी करणे. नियमित उपचाराने रोगग्रस्तांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणे. अनुवांशिक कार्डाद्वारे वाहक आणि पीडित व्यक्तीचे विवाह- समुपदेशन करणे. पुढील पिढीमध्ये सिकलसेल रोगाचा प्रसार आणि त्याचे प्रतिबंध याबाबत जागरूकता करीत माहिती देण्याचे कार्य करणे व नवीन सिकलसेल बाधित रुग्ण होऊ नये, यासाठी जन्मपूर्व निदान करण्यावर भर दिला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news