

ओझर (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एच.ए.एल) येथील कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत श्री आपला जागृती पॅनलने दणदणीत विजय मिळवला. श्री आपला जागृती पॅनलच्या वतीने सरचिटणीस पदासाठी संजय कुटे यांना १४६४ मते तर श्री श्रममशक्ती पॅनल सचिन ढोमसे यांना ११५२ मते मिळाली. अटीतटीच्या या लढतीत संजय कुटे हे ३१२ मतांची आघाडी घेऊन दुसऱ्यांदा विजयी झाले. खजिनदार पदाचे उमेदवार प्रशांत आहेर यांना १३६९ विरुद्ध श्री श्रमशक्ती पॅनलचे अमोल जोशी यांना १२४५ मते मिळाली. यामध्ये प्रशांत आहेर १२४ मतांची आघाडी घेत विजयी झाले.
अध्यक्षपदासाठी श्री आपला जागृती पॅनलचे अनिल त्र्यंबक मंडलिक व गिरीश वलवे यांच्यात लढत झाली. यामध्ये अनिल मंडलिक यांना १५६० तर गिरीष वलवे १०५७ मते मिळाली. यामध्ये अनिल मंडलिक यांना ५०३ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे गेल्या १९८६ आणि १९९० साली तत्कालीन अध्यक्ष सुरेश देसले हे सलग दुसऱ्यांदा कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर जवळपास ३५ वर्षांनी अनिल मंडलिक सलग दुसऱ्यांदा कामगार संघटनेचे अध्यक्ष झाले आहे.
शनिवारी मतदान झाले होते. यामध्ये २८१२ एच.ए.एल. कामगार मतदारांपैकी २६२७ (९३.४२%) कामगारांनी मतदानाचा हक्का बजावला. गेल्या तीन वर्षाच्या काळात कामगार संघटनेच्या वतीने दुसऱ्या विभागात बदली होऊन गेलेले कामगार ओझरला मूळ विभागात परत आणल्याने व भविष्यातील २०२७ चा वेतन करार हा महत्त्वाचा असल्याकारणाने या मोठ्या मताधिक्याने श्री आपला जागृती पॅनलच्या २९ उमेदवारांना कामगारांनी मताधिक्य दिले व श्री श्रमशक्ती पॅनलचे उपाध्यक्ष गणेश गवारे व सहचिटणीसपदी योगेश अहिरे हे विजयी झाले. लढत होत असल्याचे निवडणुकीत असलेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत सुरुवातीला मतमोजणी सुरू झाल्यानंतर खजिनदार पदासाठी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांमध्ये घासून रस्सीखेच बघायला मिळाली.
१) वेतनकरार या माध्यमातुन कामगारांच्या खिशात पडणारा आर्थिक लाभ
२) कामगारांना भरघोस आर्थिक लाभ देणारी इन्सेन्टिव्ह स्कीम
३) महारत्न दर्जामुळे मिळणारे फ़ायदे
४) करीयर प्लान रिव्ह्यू स्कीम
५)आश्रित पालकांची वैद्यकीय सुविधा,
६) ब्रँडेड प्रॉडक्शन गिफ्ट,
७) स्केल ११ कामगारांचे इन्क्रिमेंट सारखे प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन संघटनेपुढे आहे.
श्री श्रमशक्ती पॅनल (निशाणी - तराजू)
उपाध्यक्ष पदासाठी गणेश गवारे, सहचिटणीस योगेश अहिरे विजयी झाले.
श्री आपला जागृती पॅनल (निशाणी सिंह)
अध्यक्षपदासाठी अनिल त्र्यंबक मंडलिक, उपाध्यक्ष पदासाठी राकेश सुभाष गर्जे, आनंद हिरामण गांगुर्डे, प्रकाश छबू गभाले, प्रवीण तुकाराम गाढे, सरचिटणीस पदासाठी संजय रामचंद्र कुटे, सहचिटणीस पदासाठी प्रतिक विजय गोळेसर, जितेंद्र दामोदर जाधव, रोशन उत्तमराव कदम जगन्नाथ पांडुरंग खोले, खजिनदार पदासाठी प्रशांत तुकाराम आहेर, कार्यकारिणी सदस्य पदासाठी रवी अशोकराव गरूड, अश्पाक हमीद बागवान, आशिष प्रमोद भागवत, नरेंद्र प्रकाश खैरनार, प्रभाकर रंगनाथ ढाकणे, त्र्यंबक सोमनाथ बहिरम, खुशाल निंबा जाधव, हेमंत रघुनाथ ठाकूर, मुकुंद निवृत्ती क्षीरसागर, उमेश रतन जाधव, ऋषिकेश सुरेश जाधव, सचिन यशवंत वारुळे, लिना विजयानंद सोनार, कमलाकर अशोक बनकर, सोमनाथ दत्तू जाधव, हितेश केशव गंगापूरकर, परिमल प्रमोद जोशी, प्रकाश रवींद्र पतके, विकास बाबाजी जाधव, श्रीकांत भाऊसाहेब घुले हे उमेदवार विजयाकडे घौड दौंड सुरू होती.