धक्कादायक ! रात्रभर घरात झोपला, अन् सकाळी चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Nashik Crime News | नेमकं काय घडलं?
Nashik Crime News , 
attempted kidnapping
नशेखोराने दीड वर्षाच्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. File Photo
Published on
Updated on

नाशिक : नशेच्या अंमलात एका घरात शिरून रात्रभर तेथेच झोपला. तसेच सकाळी घरमालकांनी आरडाओरड केल्याने नशेखोराने दीड वर्षाच्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयितास पकडले असून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे.

उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२१) मध्यरात्रीच्या सुमारास आंबेडकर वाडी परिसरातील एका घरात ३५ वर्षीय नशेबाज व्यक्ती शिरला. घरातील सदस्या जोपलेले असतानाही संशयितही नशेत तेथेच झोपला. पहाटे साडेपाचच्या सुमारास घरमालक जागा झाला. त्यावेळी त्याला जवळ संशयित व्यक्ती झोपलेला दिसला. त्यामुळे घाबरून त्यांनी आरडाओरड केला. आरडाओरड झाल्याने संशयितही जागा झाला. त्याने पंलगावर असलेल्या दीड वर्षीय चिमुकलीला उचलून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र घरमालकाने त्यास विरोध करत चिमुकलीचा ताबा घेतला. त्यानंतर पोलिसांना ही घटना समजताच त्यांनी त्यास अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयितास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कायम नशेच्या आहारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित व्यक्ती हा नेहमी नशेच्या आहारी असतो. त्याच्या घरच्यांनी व्यसनमुक्ती केंद्रातही त्यास दाखल केले होते. मात्र त्याची सवय सुटली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news