Shiv Jayanti 2025 | काय सांगता? शिवजयंती वर्गणीच्या नावे पाच लाखांची खंडणी

व्यापाऱ्याची पोलिसांत धाव : सराईतावर गुन्हा दाखल
Shiv Jayanti 2025 | काय सांगता? शिवजयंती वर्गणीच्या नावे पाच लाखांची खंडणी
Published on
Updated on

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी सराईताने भाजीपाला व्यापाऱ्याकडे चक्क पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला. तसेच घरासमोर येऊन जिवे ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे व्यावसायिकाने पोलिसांत धाव घेत याप्रकरणी फिर्याद दिली. पंचवटी पोलिस ठाण्यात या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापारी सागर सुधाकर पगारे (रा. फुलेनगर, पेठ रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित सराईत सागर जाधव (रा. राहुलवाडी, फुलेनगर) व त्याचा साथीदार यांनी बुधवारी (दि. ५) पगारे हे दिंडोरी रोडवरील मार्केट यार्ड येथे आपला व्यवसाय सांभाळत असताना, जयंतीच्या वर्गणीची मागणी केली. तसेच डेकोरेशनसाठी पाच लाख रुपये द्यावेत, असा दम भरला. पगारे यांनी देण्यास असमर्थता दाखविल्यानंतर संशयित सागर जाधव यांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यामुळे घाबरलेल्या पगारे यांनी दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर शुक्रवारी (दि. ७) सकाळी संशयित जाधव व त्याच्या साथीदाराने पगारे यांच्या घरासमोर येत, जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी जाधवच्या साथीदाराने, तुला मार्केटमध्ये पाय ठेवू देणार नसल्याचेही म्हटले. यामुळे भेदरलेल्या पगारे यांनी पुन्हा पोलिसांत धाव घेत आपबिती सांगितली. दरम्यान, पोलिसांनी जाधव व त्याच्या साथीदारावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news