देवळाली कॅम्प : येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीने जुने बसस्थानक परिसरात 50 फूट उंचीचा शिवराज्याभिषेक प्रसंगाचा देखावा उभा केला आहे.
वीस दिवसांपासून सुरू होती उभारणी
साठ फूट लांब
पन्नास फूट उंच
तीस फूट रुंद असा देखावा साकारण्यात आला आहे
‘एक शहर, एक जयंती’ या संकल्पनेच्या माध्यमातून येथे काही वर्षांपासून सर्वधर्मीय व सर्वपक्षीय कार्यकर्ते शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करतात. यंदा किल्ल्याचा नगारखाना, तटबंदी हा देखावा दाखवितानाच राज्याभिषेकाचा प्रसंगही साकारला आहे.
सिंहासनारुढ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, मागे उंचावर हनुमानाची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यासाठी 20 दिवसांपासून कारागीर परिश्रम घेत होते. 50 फूट उंच, 60 फूट लांब आणि 30 फूट रुंद अशी ही देखाव्याची रचना आहे.