Shinde Sena Group News : संगीता पाटील यांची शिवसेना महिला सेना प्रभारी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

नाशिक पूर्व आणि नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघांचे कार्यक्षेत्र
नाशिक
नाशिक : शिवसेना मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

Sangeeta Arun Patil has been appointed as the Shiv Sena Women's Wing District Chief

नाशिक : शिवसेना मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संगीता अरुण पाटील यांची शिवसेना महिला सेना प्रभारी जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडे नाशिक पूर्व आणि नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघांचे कार्यक्षेत्र सोपवण्यात आले आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. "संगीता पाटील या सर्वांना सोबत घेऊन नाशिकमध्ये शिवसेना पक्षवाढीसाठी सक्रियपणे कार्य करतील," असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, जिल्हा संपर्कप्रमुख संगीता खोडाना, विलास शिंदे, बंटी तिदमे, मंगला भास्कर, शीला दीक्षित, सुवर्णा मटाले, अस्मिता देशमाने, विशाल खैरनार यांच्यासह भाऊलाल तांबडे, दिगंबर मोगरे, पुनम मोगरे, सुनिता हजारे, पुष्पा वायकंडे, श्रद्धा कोतवाल, मनोरमा पाटील, ज्योती देवरे, भारती चित्ते, मीरा भोईर, गीता गुप्ता, अर्चना मगर, जयश्री पगार यांनी अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news