इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घडली घटना

शिक्षकाविरोधात घोटी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घडली घटना
Published on
Updated on

इगतपुरी : तालुक्यात पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सर्वतीर्थ टाकेद येथील शाळेत पुन्हा एकदा आठवीच्या विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार आला समोर आला आहे. या प्रकरणी पिडीत विद्यार्थीनीने घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर सदर शिक्षकाविरोधात घोटी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, टाकेद येथील न्यु इंग्लीश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे मंगळवार दि. २८ रोजी दुपारी सदरची पिडीत विद्यार्थीनी आपल्या भावासोबत कागदपत्रांवर मुख्याध्यापकांचे सही शिक्के घेण्यासाठी गेली होती. यावेळी या शाळेतील शिक्षक अर्जुन गभाजी हरीश्चंद्रे यांनी मुख्याध्यापक बैठकीत असून मी सही शिक्के घेऊन देतो असे सांगत भावाला शाळेबाहेर उभे करून तिला आत कक्षात नेले. नंतर या शिक्षकाने मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव करत अश्लील भाषा वापरून तिचा विनयभंग केला. या प्रकाराने मुलीने घाबरून कागदपत्र हातात घेत ताबडतोब तिथून निघून गेली.

या विद्यार्थीनीचे पालक बाहेरगावी गेले असल्याने सकाळी पालक घरी आल्यावर मुलगी रडत असताना पाहिले असता विचारपूस केल्यावर घटनेला वाचा फुटली. बुधवार (दि. २९) सकाळीच पालक व गावातील नागरिकांनी तात्काळ शाळा गाठत शिक्षक अर्जुन हरीश्चंद्रे याला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर विद्यार्थीनीने घोटी पोलीस ठाण्यात तक्रार करताच घोटी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ संशयित शिक्षकास घेतले ताब्यात घेतले.

या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कांजन भोजने, उपनिरीक्षक प्रविण उदे पोलीस हवालदार सुनिल पाटील, गौरव सोनवणे, पंकज दराडे, परिक्षित इंगळे, अनिकेत मोरे, श्रीकांत खैरे पुढील तपास करीत असुन घोटी पोलिस ठाण्यात शिक्षक अर्जुन हरीश्चंद्रे याच्या विरोधात कलम ७४,७५ (२),७९ सह पोस्को ८ व १२ सह अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम ३(१) (w) (i), ३(१) (w)(ii), ३(२) (va) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे टाकेद येथील याच शाळेते १३ वर्षीय बालिकेवरील लैंगिग अत्याचार प्रकरणी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापकाला जन्मठेप कारावासाची शिक्षा तर सहआरोपी वर्गशिक्षकाला सहा महिने कारावास द्रव्यदंडाची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टीने सुनावली आहे.

इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज टाकेद बु. येथे शाळेतील मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींला वर्गशिक्षक शिक्षक गोरखनाथ जोशी याच्या मदतीने घरी बोलावून तिच्यावर लैंगिग अत्याचार बलात्कार केल्याची घटना ७ फेब्रुवारी २०२५ मध्ये घडली होती. शाळेतील मुख्याध्यापकानेच वर्गशिक्षकाच्या मदतीने इयत्ता सहवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले होते. तसेच तालुक्यातील अडसरे येथेही शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थीनी सोबत विनयभंग केल्याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात वारंवार घटना होऊनही इगतपुरी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी करतात तरी काय असा प्रश्न या परिसरातील पालकांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news