जेष्ठ साहित्यिक गो. तु. पाटील यांचे निधन

व्यासंगी साहित्यिक व संपादक हरपला
Senior Literary Govind Tukaram Patil passed away
जेष्ठ साहित्यिक गो. तु. पाटील यांचे निधन pudhari photo
Published on
Updated on

येवला : ज्येष्ठ साहित्यिक व अनुष्टुभ परिवारातील ज्येष्ठ संपादक गोविंदा तुकाराम तथा गो. तु. पाटील यांचे रविवारी (दि. १८) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज, सोमवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता येवला येथील त्यांच्या कृतज्ञता निवासस्थानापासून निघणार आहे. त्यांच्या निधनाने एक व्यासंगी साहित्यिक व संपादक हरपला आहे.

त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. गो. तु. पाटील यांचे मूळगाव सूनसगाव खुर्द, ता.जामनेर असून, त्यांचे माध्यमिक शिक्षण कुऱ्हे पानाचे, ता. भुसावळ येथे बहिणीकडे झाले. त्यानंतर त्यांनी उच्चशिक्षण घेतले. याचवेळी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. तीच त्यांची कर्मभूमी झाली. नोकरी सांभाळतांनाच त्यांनी मराठी साहित्यात देखील आपले कार्य सुरू केले. अनुष्टुभ सारखे दर्जेदार नियतकालिक त्यांनी चालविले. मराठी साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news