Nashik water shortage : सय्यदपिंपरी रोड, विंचूरगवळी फाट्यावर पाणीटंचाई

महिलांची भर पावसात भटकंती
Nashik water shortage
आडगाव : आडगाव, सय्यदपिंपरी रोड, विंचूरगवळी फाटा परिसरात पाण्याच्या शोधात असलेल्या महिला.file photo
Published on: 
Updated on: 

आडगाव : आडगाव, सय्यदपिंपरी रोड, विंचूरगवळी फाटा परिसरात अपुर्‍या पाणीपुरवठ्यामुळे रहिवासी त्रस्त असल्याचे दिसून येत आहे. पुरेसे पाणी मिळण्यासाठी महिलांनी अंगणातील नळाच्या पाइपखाली चार-पाच फूट खड्डे केले आहेत. परंतु महिलांना पाणी मिळत नाही. एक ते दोन ठिकाणी पाणी येते तिथेही महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते.

परिसरात 15 ते 20 वर्षांपूर्वी जलवाहिनी टाकण्यात आली होती. त्यावेळी घरांची संख्या फक्त 9 ते 10 होती. आता या परिसरात घरांची संख्या 100 ते 150 वर पोहोचली आहे. या परिसरासाठी वेगळ्या जलवाहिनीची व्यवस्था केली असता त्या जलवाहिनीला अन्य ठिकाणी नळकनेक्शन जोडल्यामुळे परिसराला पाणी मिळत नसल्याची नागरिकांकडून तक्रार केली जात आहे.

बर्‍याचदा पाणीपुरवठा विभागाला तक्रार करूनही पाणीपुरवठा विभाग चालढकल करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केली आहे. परिसरातील नागरिकांना वाली कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा सुधारण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सागर माळोदे, शंकर झोमन, दत्तू ठाकरे, ज्ञानेश्वर ठाकरे, वामन शिंदे, किसन माकोडे, मंगल माळोदे, हिराबाई शिंदे, ज्योती लभडे, भारतीय नवले, कुसुम ठाकरे आदींनी याबाबत निवदेन दिले आहे.

वीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली जलवाहिनी आता अपुरी ठरली आहे. मुख्य पाण्याच्या टाकीतील पाणी संपते तेव्हा आमच्याकडे पाणी सोडले जाते. त्यावेळी पाण्याचा कमी दाब असल्याने पाणी येतच नाही.

हिराबाई शिंदे, त्रस्त महिला

प्रशासनाला बर्‍याचदा निवेदन देऊन झाले. पण अधिकारी दुर्लक्ष करतात.त्यामुळे येथील प्रश्न अद्यापही कायम आहेत. दहा दिवसांत काम झाले नाही तर या परिसरातील सर्व नागरिक महापालिकेवर येऊन हंडा मोर्चा काढतील.

सागर माळोदे, सामाजिक कार्यकर्ते, आडगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.